Kolhapur Assembly Election 2024 : ‘दक्षिण’च्या रणरागिणी ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी - मधुरिमाराजे छत्रपती

‘प्रत्येकाशी आदराने वागणारे, सर्वसामन्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला लाभले आहे.
Kolhapur Assembly Election 2024 Madhurimaraje Chhatrapati support to ruturaj patil
Kolhapur Assembly Election 2024 Madhurimaraje Chhatrapati support to ruturaj patil
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘प्रत्येकाशी आदराने वागणारे, सर्वसामन्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला लाभले आहे. आपल्या सर्वांच्या अडचणी समजून घेऊन मदतीसाठी सदैव धावून येणाऱ्या ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी ‘दक्षिण’च्या रणरागिणी ठामपणे उभ्या राहतील,’ असा विश्वास मधुरिमाराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. उचगाव येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, ‘आमदार ऋतुराज पाटील यांनी मणेर मळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे स्मार्ट स्कूलमध्ये रुपांतर केले. कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे. मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. यामुळेच स्वाभिमानी व कष्टकरी महिलांनी त्यांना विजयी करावे.’

महिला प्रदेश काँग्रेसच्या सचिव भारती पोवार म्हणाल्या, ‘महिलांचा अपमान करणारे धनंजय महाडिक पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होते. या काळात मिळालेले मानधन त्यांनी पक्षाकडे जमा करावे, मगच महिला, भगिनींना सल्ले द्यावेत.’

पूजा पाटील म्हणाल्या, ‘महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण राबवून अनेक महिलांना स्वावलंबी बनवले आहे. ‘मी दुर्गा’या उपक्रमांतर्गत १५ हजारांहून अधिक शालेय विद्यार्थिनींना सुरक्षित बनवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशन केले आहे.’

‘आम्ही लाचार नाही, स्वाभिमानी आहोत, हे महाडिकांनी लक्षात ठेवावे. ही भाषा त्यांना महागात पडेल,’ असा इशारा ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चव्हाण यांनी दिला. यावेळी दक्षिण महिला काँग्रेस कौशल्य विभाग प्रमुख राणी खंडागळे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी सभापती पूनम जाधव, जि. प. माजी सदस्य मंगल वळकुंजे, माजी सरपंच मालू काळे, संजीवनी वळकुंजे, सुरेखा चौगुले, ग्रा. पं. सदस्य सुनीता चव्हाण, सारिका माने, नीता हावळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, वैजयंती यादव, त्रिशा पाटील, जयश्री पाटील, माजी उपसरपंच मनीषा गाताडे, उमा कदम, कल्पना चौगुले व महिला उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com