Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात आयटी पार्क उभारणार - राजेश क्षीरसागर

‘स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी, यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले.
Kolhapur Assembly Election  2024 rajesh kshirsagar says will build it park at kolhapur
Kolhapur Assembly Election 2024 rajesh kshirsagar says will build it park at kolhapur
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी, यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले. बापट कॅम्प येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे आदिल फरास आदी उपस्थित होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘आपल्या जिल्ह्यातील उच्चशिक्षित युवक-युवती नोकरीसाठी इतर शहरात जात आहेत. काही युवक विदेशात जात आहेत. आपली मुले बाहेर जाऊन उच्चपदावर काम करत आहेत, ही अत्यंत चांगली बाब आहे.

मात्र, यामुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत आहे. यासाठी आपल्या मुलांना इथेच उच्चपदाच्या नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून आयटी पार्क सुरू होणे काळाची गरज आहे. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

मी माझ्या आमदारकीच्या काळात तसेच राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे उभी केली. महायुतीला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे विरोधक बिथरले असून, आमच्यावर बेछूट आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांचा डाव ओळखा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या.

आपल्याकडे विकासकामांना सहकार्य करण्यापेक्षा विरोध करणारीच जास्त झाली आहेत. सामाजिक कार्य करत असताना विरोधक असावेत. पण, त्यांच्या विरोधात प्रामाणिकपणा असावा. सत्य आणि तथ्य यासाठी विरोध व्हावा. विरोधासाठी विरोध यामुळे कोल्हापूर मागे पडत आहे.’

यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यासह सतीश कुंभार बाचणीकर, महेंद्र तुकाराम कुंभार, अभिषेक जाधव, दीपक सातपुते, मीनाक्षी कुंभार, शमा कातवरे, शंकर कातवरे, अभिजित कुंभार, शैलेश कुंभार-बाचणीकर, उत्तम मंडलिक, चंद्रकांत गोरंबेकर, प्रमोद कुंभार, अभिषेक ढेरे, अभिजित कातवरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com