कोल्हापूरला 'पोलिस आयुक्तालया'ची प्रतीक्षाच; पोलिस महासंचालकांच्या दौऱ्याकडे लक्ष

जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, त्या अनुषंगाने वाढता क्राईम रेट याचा विचार करून कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू व्हावे, अशी 25 वर्षांपासून मागणी आहे. त्याचे प्रस्ताव वेळोवेळी पोलिस दलाकडून पोलिस महासंचालकांकडे व तेथून राज्य शासनाकडे पाठविले आहेत
Kolhapur Waiting for Police Commissionarate
Kolhapur Waiting for Police Commissionarate
Published on
Updated on

कोल्हापूर : लवकरच कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू होईल, अशा फक्त घोषणाच 25 वर्षे ऐकण्याची सवयच कोल्हापूरकरांना झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढलेला क्राईमरेट, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, याचा विचार करून आयुक्तालयाच्या मंजुरीसाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणाऱ्या पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून आहे.

जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, त्या अनुषंगाने वाढता क्राईम रेट याचा विचार करून कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू व्हावे, अशी 25 वर्षांपासून मागणी आहे. त्याचे प्रस्ताव वेळोवेळी पोलिस दलाकडून पोलिस महासंचालकांकडे व तेथून राज्य शासनाकडे पाठविले आहेत. प्रत्येकवेळी मंजुरीचे आश्‍वासन नेत्यांकडून दिले जाते; पण अद्याप आयुक्तालयाला मंजुरी मिळालेली नाही. यापूर्वी पाठवलेल्या प्रस्तावात काही उणिवा असल्याने तो प्रस्ताव काही दिवसांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात. त्यानुसार उणिवा दूर करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, राज्याचे पोलिस महासंचालक जयस्वाल हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांना कोल्हापुरातील पोलिस आयुक्तालयाची नेमकी किती गरज आहे, हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. त्यांनी ही गरज ओळखून प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आवश्‍यक पाठपुरावा करावा, अशी जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.

त्याचबरोबर विशेष मोका न्यायालय कोल्हापुरात व्हावे, याचा प्रस्तावही कोल्हापूर पोलिस दलाने मंजुरीसाठी पाठवला आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात मोका अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. संशयितांना घेऊन पोलिसांना प्रत्येकवेळी पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात जावे लागते. त्यामुळे हे न्यायालय कोल्हापुरात होणे गरजेचे आहे. या मागणीला जिल्हा बार असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावालाही मंजुरी कशी मिळेल, याबाबतचे अधिकाऱ्यांना श्री. जयस्वाल काय मार्गदर्शन करणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. तसेच मुख्यालयातील पोलिसांसाठी ७००, तर लक्ष्मीपुरीतील २७१ निवासस्थानांचाही प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.


गोळीबार मैदानातील जागा आरक्षित

पोलिस आयुक्तालयासाठी पाठविलेल्या प्रस्तावात कसबा बावडा येथील गोळीबार मैदानातील २८ एकर जागा राखीव ठेवली आहे. शेजारील दोन एकर जागा फॉरेन्सिक लॅबसाठी राखीव आहे.

पोलिस आयुक्तालयामुळे असे बदलेल स्वरूप

*पोलिस आयुक्त : 1
*पोलिस उपआयुक्त : 2
*सहायक पोलिस आयुक्त : 10
*पोलिस निरीक्षक : 48
*सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक : 145
*पोलिस कर्मचारी : 3000 हून अधिक


हे विभाग शहर व ग्रामीणमध्ये विभागतील

*पोलिस मुख्यालय
*कोल्हापूर ग्रामीण व शहर
*मोटार परिवहन विभाग
*शस्त्र विभाग
*परेड मैदान
*अधिकाऱ्यांची निवासस्थाने
*बिनतारी संदेश विभाग
*जिल्हा विशेष शाखा
*ठसेतज्ज्ञ विभाग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com