राजेंच्या बालेकिल्यात कमी मतदान; टक्केवारी वाढवण्यासाठी नेते -कार्यकर्ते सरसावले

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यातील दोन हजार 978 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल. सातारा लोकसभेसाठी सात तर विधानसभेसाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनूसार मतदार प्रथम लोकसभेसाठी व नंतर विधानसभेसाठी मतदान करीत आहेत.जिल्ह्यात सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि आठ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 82 हजार 166 असे 11.18 टक्के इतके मतदान झाले आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यातील दोन हजार 978 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल. सातारा लोकसभेसाठी सात तर विधानसभेसाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनूसार मतदार प्रथम लोकसभेसाठी व नंतर विधानसभेसाठी मतदान करीत आहेत. जिल्ह्यात सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि आठ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 82 हजार 166 असे 11.18 टक्के इतके मतदान झाले आहे.
 
दरम्यान सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि सहा विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 18 हजार 514 मतदारांनी (11.80 टक्के) इतके मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कमी सातारा विधानसभा मतदारसंघात 27 हजार 788 इतके तसेच कऱ्हाड दक्षिण येथे 44 हजार 937 इतके सर्वाधिक मतदान झाले आहे. अन्य विधानसभा मतदारसंघात वाई 31 हजार 598, कोरेगाव 46 हजार 737, कऱ्हाड उत्तर 31 हजार 092, पाटण 36 हजार 362 असे मतदान झाले आहे.
 
याव्यतिरिक्त फलटण 40 हजार 670 तसेच माण 22982 मतदारांनी असे एकूण 63 हजार 652 मतदारांनी (9.47 टक्के) इतके मतदान केले आहे. बहुतांश मतदारसंघात मतदारांनी मतदानासाठी यावेत यासाठी कार्यकर्ते पुढाकार घेऊ लागले आहेत. नेते मंडळी देखील नागरीकांनी मतदानासाठी बाहेर पडावे असे माध्यमांतून आवाहन करीत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com