Radhanagari Assembly Election 2024 : फसवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल - प्रभाकर पाटील

‘‘ज्यांच्या जीवावर दोनदा आमदार झाले, त्या दाजीला फसवणारी मंडळी आता जनतेची फसवणूक करण्यासाठी आली आहेत. त्यांच्यापासून सावध राहूया. राधानगरीची जनताच अशा प्रवृत्तीला निवडणुकीत धडा शिकवेल
Radhanagari Assembly Election 2024 prabhakar patil says people justice with best leaders among
Radhanagari Assembly Election 2024 prabhakar patil says people justice with best leaders among
Published on
Updated on

माजगाव : ‘‘ज्यांच्या जीवावर दोनदा आमदार झाले, त्या दाजीला फसवणारी मंडळी आता जनतेची फसवणूक करण्यासाठी आली आहेत. त्यांच्यापासून सावध राहूया. राधानगरीची जनताच अशा प्रवृत्तीला निवडणुकीत धडा शिकवेल, असा विश्‍वास प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केला.

माजगाव (ता. राधानगरी) येथे राधानगरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. प्रभाकर पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत संधी मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी उध्दव ठाकरे शिवसेनेची वाट धरली. निष्ठावंत शिवसैनिकांना ही उमेदवारी मान्य नाही. नेतृत्वासह मतदारसंघातील सामान्य माणसाची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला आता कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे.’’

ए. वाय. पाटील म्हणाले, ‘‘पैशाने बलाढ्य असणाऱ्या दोन शक्ती माझ्याविरोधात आहेत. या पैशाला स्वाभिमानी जनता थारा देणार नाही. पैसा आणि भुलथापांना बळी न पडता ती मला बळ देईल, यात शंका नाही.’’ भगवान पातले म्हणाले, ‘‘आजी-माजी आमदारांनी वीस वर्षांत जनतेची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला.

सामान्य माणसाला लुटून मिळवलेल्या पैशातून कोणी सत्तेचे स्वप्न बघत असेल, तर ते कधीही यशस्वी होणार नाहीत.’’ यावेळी राजू कवडे, नेताजी पाटील, महादेव कोथळकर, शिवाजी पाटील, युवराज वारके, प्रकाश मोहिते, गौतम कांबळे, तानाजी काटकर, शामराव वरुटे, युवराज पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com