'जयंत'निती विरुद्ध संभाजी पवारांची रणनिती काय? 

माजी आमदार संभाजी पवार यांनी एकीकडे शिवसेना-भाजप युतीचा प्रस्ताव देत दुसरीकडे 'जयंत'नितीला रोखण्यासाठी शड्डू ठोकला आहे.
Pawar-Patil.
Pawar-Patil.
Published on
Updated on

सांगली :  महाआघाडीतील बिघाडीनंतर सांगलीच्या आखाड्यात पुन्हा जम बसवताना राष्ट्रवादीची सतत दमछाक होत आली आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेससोबत गेलो तरच तंबू टिकेल, असे गणित दिसत असताना ही आघाडी पक्षात बिघाडी ठरू शकते, अशीही भिती आहे. अशावेळी माजी आमदार संभाजी पवार यांनी एकीकडे शिवसेना-भाजप युतीचा प्रस्ताव देत दुसरीकडे 'जयंत'नितीला रोखण्यासाठी शड्डू ठोकला आहे. 

भाजपशी सुरक्षित अंतर राखून सलगी करत जयंतराव पाटील यांची  चहूबाजूंनी कोंडी करता येते का, याचा आदमास पवार गट घेत आहे. या खेळात स्वबळ वाढवण्याबरोबरच राष्ट्रवादीची कोंडी करणे, असा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न दिसतोय. या मांडणीत त्यांना भाजप किती साथ देणार, याकडे लक्ष असेलच, शिवाय पवारांनी ताणलेल्या या धनुष्याला शिवसेनेचा ताकदीचा 'बाण' मिळणार का, हा खरा महत्वाचा प्रश्‍न आहे. पृथ्वीराज पवार थेट सेना नेते आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे सेना सांगलीत नवे धोरण आखेल, असेही संकेत मिळत आहेत. 

सांगली विधानसभा क्षेत्र आणि महापालिका क्षेत्रात पवार गटाला आपले प्रमुख विरोधक म्हणून स्थान अबाधित राखण्याचे पहिले आव्हान असणार आहे. इथे सध्या विरोधकाची मोठी पोकळी आहे. या घडीला गणिताची मांडणी पाहता स्वबळावर सत्तेजवळ जाणे मुश्‍किल आहे. भाजपशी जुळवून घेण्याचा वडीलकीचा सल्ला आणि पुढाकार संभाजी पवार यांनी घेतला आहे. तो वरिष्ठ शिवसेना केडरसह स्थानिक अन्य सेना नेत्यांना पचणारा नसला तरी हा चेंडू पवारांची दिशा दर्शविणारा आहे. 

त्याआधी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा, भाजप नेत्यांचा आप्पांच्या भेटीचा विशेष योग अशा अनेक प्रकरणांतून भाजपची खेळपट्टी पूरक करण्याचा प्रयत्नही झाला आहे. अर्थात, थेट भाजप प्रवेशापेक्षा 'सबका साथ, सबका विकास' या धोरणाची आखणी व्हावी, अशी दोन्हीबाजूंनी चर्चा दिसते आहे. भाजपकडे अर्थातच, 'प्रबळ' उमेदवारांची वानवा आहे. त्यांचे लक्ष राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून कोण फुटून येतो का, याकडे असल्याचेही बोलले जाते. अशावेळी वेगवेगळ्या गटांना सोबत घेऊन महापालिका ताब्यात घेण्याची भाजपचा मनसुबा आहे. 


भाजपची ही 'गरज' पवारांच्या ताणलेल्या बाणाला साथ देणार का, 'बीजेपी' आता  'जेजेपी' राहिलेली नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे खरेच वास्तववादी आहे का, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे या नव्या मांडणीतून मिळू शकतात. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नवी रंगत येऊ शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com