सतेज पाटलांनी निश्चित केले निलोफर आजरेकरांचे नाव!

महापौर पदासाठी कॉंग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच होती. सौ. इंदुमती माने, उमा बनछोडे, सौ. जयश्री चव्हाण,दिपा मगदूम अशी इच्छुकांची यादी मोठी होती. तथापि आघाडीचे नेते गृहराज्यमंत्री पाटील यांनी सौ. आजरेकर यांना या पदावर संधी दिली. ही निवड सहा महिन्यासाठीच असण्याची शक्‍यता आहे.
nilophar-aajrekar
nilophar-aajrekar
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज सत्तारूढ कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून निलोफर आजरेकर यांचे नांव निश्‍चित झाले. आघाडीचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सौ. आजरेकर यांचे नांव निश्‍चित केल्याची माहिती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी नगरेसवकांना दिली. त्यानंतर सौ. आजरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी अंतर्गत महापौर, उपमहापौर पदासह इतर पदांचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार पुढील वर्षभरासाठी हे पद कॉंग्रेसच्या वाट्याला आले आहे. यापुर्वीच्या महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर यांना 76 दिवस महापौर पदाची संधी मिळाली, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, विरोधी भाजपा-ताराराणी आघाडीकडूनही या निवडणुकीसाठी सौ. अर्चना पागर यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार, उपमहापौर संजय मोहिते, शिक्षण समितीचे सभापती श्रावण फडतारे, नगरसेवक अशोक जाधव, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, राजू लाटकर, मावळत्या महापौर सौ. लाटकर यांच्या उपस्थितीत सौ. आजरेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सौ. आजरेकर ह्या बिंदू चौक प्रभागातून विजयी झाल्या आहेत.

महापौर पदासाठी कॉंग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच होती. सौ. इंदुमती माने, उमा बनछोडे, सौ. जयश्री चव्हाण,दिपा मगदूम अशी इच्छुकांची यादी मोठी होती. तथापि आघाडीचे नेते गृहराज्यमंत्री पाटील यांनी सौ. आजरेकर यांना या पदावर संधी दिली. ही निवड सहा महिन्यासाठीच असण्याची शक्‍यता आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com