Shambhuraj Desai: सीमावादानंतर पहिल्यांदाच मंत्री शंभुराज देसाई यांची तोफ सीमाभागात धडाडणार!

Shambhuraj Desai: चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शंभुराज देसाई जाणार
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama

संभाजी थोरात

कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. याच दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात न येण्याचा इशारा दिला होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मंत्री व शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी सीमावर्ती भागाचा दौरा करणार आहे.

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभुराज देसाई आज सीमाभागातून प्रवास करणार आहेत. या प्रवासा दरम्यान ते सीमाभातील लोकांशी संवाद साधणार का याची उत्सुकता आहे.

Shambhuraj Desai
Chhagan Bhujbal News; राज्यात आणीबाणी लागू केली आहे काय?

चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शंभुराज देसाई जाणार आहेत. जाताना ते कोगनोळी टोल नाक्यावरून पुढे संकेश्वर मार्गे गडहिंग्लजकडे जाणार आहेत. हा सगळा प्रवास सध्या कर्नाटकात असणाऱ्या आणि महाराष्ट्राचा दावा असणाऱ्या भागातून करणार आहेत.

Shambhuraj Desai
Sushma Andhare : '' सुषमा अंधारे वाघीण नाही तर माकडीण..''; शिंदे गटाच्या महिला नेत्यानं डिवचलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात नुकतीच बैठक झाली आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या या प्रवासाला महत्त्व प्राप्त झाल आहे. या दौऱ्यात ते सीमा भागातील लोकांना भेटणार का त्यांच्या समस्या जाणून घेणार का याची उत्सुकता आहे.

सीमावादावर अमित शाह काय म्हणाले..

महाराष्ट्र-कर्नाटकचा तापलेला सीमावाद शांत करण्याासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात बुधवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात प्रमुख्याने सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, एकमेकांच्या भूभागावर कोणताही दावा करु नये. तसंच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी असाही निर्णय घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com