चिपरीत येवूनही शरद पवारांनी यड्रावकरांना टाळले

शिरोळ विधानसभा स्वाभिमानीच्या वाट्याला गेला आहे. याठिकाणी यड्रावकर यांनी बंडखोरी केली आहे. ते आमच्याबरोबर राहिल्यास स्वाभिमानीला यश मिळू शकेल. हिच बाब श्री पवार यांना सांगितली. त्यांनी यड्रावकर यांना बोलावून चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले होते.- मिलींद साखरपे(शहराध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, जयसिंगपूर)
चिपरीत येवूनही शरद पवारांनी यड्रावकरांना टाळले
Published on
Updated on

जयसिंगपूर (कोल्हापूर): राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बंडखोरी या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींच्या अपेक्षा फोल ठरल्या. चिपरी येथील उद्योगपती संजय घोडावत ग्रुपच्या हेलिपॅडवर येवूनही श्री पवार यांनी यड्रावकर यांना टाळल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने शिरोळ विधानसभेतील बंडखोरीचा प्रश्‍न थेट पवार साहेबांच्या दरबारात उपस्थित केला. यातून काही तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा स्वाभिमानीला होती. मात्र, श्री पवार यांनी भेट टाळल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस श्री पवार यांनी घोडावत यांच्या हेलिपॅडवरुन जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात आणि शेवट केला. शिरोळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खंदे समर्थक असणाऱ्या श्री यड्रावकर यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाने निष्ठा डावलल्याच्या भावनेतून त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.

श्री पवार यांचा दौरा पदरात काही तरी टाकून जाईल या भावनेतून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून श्री पवार यांचा संपर्क वाढविला होता. शिरोळमध्ये राष्ट्रवादीच्या यड्रावकर यांनी बंडखोरी केल्याने अडचणी येत असून त्यांची मनधरणी करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, मिलींद साखरपे यांनी केली होती. श्री पवार यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र, सलग दोन दिवस शिरोळ तालुक्‍यात येऊनही श्री पवार यांनी यड्रावकर यांना टाळल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

श्री पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून बंडखोरीचे संकट दूर होईल अशी स्वाभिमानीला आशा होती. थेट पवार यांची भेट घेऊन तालुक्‍यातील राजकीय स्थितीची माहितीही देण्यात आली. मात्र, पवार यांनी यड्रावकर यांची मनधरणीचा प्रयत्न केला नसल्याने स्वाभिमानीच्यावतीने प्रचार यंत्रणा आणखी गतीमान केली आहे.
 

शरद पवार साहेब दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, भेटीसाठी त्यांच्याकडून निरोप आला नाही. निरोप आला असता तर त्यांची भेट घेतली असती. पवार साहेब आमचे नेते आहेत. मात्र, सध्या शिरोळ विधानसभेतील मतदारांच्या भावना लक्षात घेऊन निवडणूकीला सामोरे गेलो आहे.

- राजेंद्र पाटील (यड्रावकर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com