Atpadi Khanapur Vidhan Sabha : सर्वांच्या आशीर्वादाने गुलाल आपलाच - डॉ. शीतल बाबर

‘आमदार अनिल बाबर आपल्यातून निघून गेले आहेत, असे मी म्हणणार नाही. विचाराने ते आपल्यासमवेतच आहेत.
shital babar says will won this assembly election 2024 mla anil babar politics
shital babar says will won this assembly election 2024 mla anil babar politics
Published on
Updated on

विटा : ‘‘आमदार अनिल बाबर आपल्यातून निघून गेले आहेत, असे मी म्हणणार नाही. विचाराने ते आपल्यासमवेतच आहेत. हे सगळे चेहरे दिवंगत अनिल बाबर यांचेच आहेत आणि सगळ्यात मोठा चेहरा सुहास बाबर यांच्या रुपाने आपण निवडणुकीसाठी उभा केला आहे. सर्वांच्या आशीर्वादाने गुलाल आपलाच आहे,’’ असा विश्वास संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉ. शीतल बाबर यांनी व्यक्त केला.

खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ डॉ. बाबर यांनी आळसंद परिसरात झंझावाती प्रचार दौरा केला, त्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. बाबर म्हणाल्या, ‘‘मी अनिल बाबर यांच्या घरातली असल्यामुळे त्यांच्या कामाबद्दल ऐकलं होतं. मात्र आज प्रचारानिमित्ताने बाहेर पडल्यानंतर त्यांनी केलेले काम पाहता अनिल बाबर हे नाव नाही, तर खूप मोठा विचार आहे, याची जाणीव झाली. त्यामुळेच या निवडणुकीत आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे.

या रणधुमाळीत घरोघरी, दारोदारी केवळ सुहास बाबर यांचेच नाव आहे. मतदारसंघाला दिवंगत अनिल बाबर यांनी पाणी दिल्याने हिरवळ तर आलेलीच आहे. शेतीमधून उत्पन्न वाढून पैसा खळखळला जावा आणि या मतदारसंघाला सुहास बाबर यांच्या माध्यमातून सोनेरी रंगत येईल.’’

त्या म्हणाल्या, ‘‘ दिवंगत शोभा बाबर यांच्या निधनानंतर अनिल बाबर अवघ्या काही दिवसांतच घराबाहेर पडले. अमोल, सुहास बाबर हेही दुःख कवटाळत न बसता जनतेसाठी बाहेर पडले. जगात यासारखा दुसरा कुठला मोठा विचार नाही. हा विचार त्यांनी आमच्यात रुजवला आहे. सुहास बाबर यांच्या मागे मोठी ताकद उभा करूया.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com