कोल्हापूर : सभासदांवर दबाव टाकण्यासाठीच बावड्यातील खासगी सभागृहात गोकुळची सभा घेतली का, असा प्रश्न संचालिका शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे. गोकुळमधील सत्ताधाऱ्यांचे दबावतंत्र मोडीत निघेल आणि सत्ताधाऱ्यांना सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात शौमिका महाडिक म्हटले की, कोणत्याही संस्थेची वार्षिक सभा म्हणजे सभासदांसाठी मत मांडण्याचे व संस्थेच्या कारभाराची माहिती जाणून घेण्याचे हक्काचे व्यासपीठ. गोकुळची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्टला कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार असल्याचे समजते.
अचानक बोलावलेली विशेष सभा वगळता आजतागायत गोकुळची प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा संघातच होते. यामागे गोकुळच्या कुटुंबाने किमान एकदातरी एकत्रित जमावे, अशी भावनिक किनार होती. त्यासोबत नाहक खर्च टाळला जावा, असा व्यावहारिक दृष्टिकोनसुद्धा होता; मात्र यंदाची सभा संघात न घेता बावड्यातील खासगी हॉलमध्ये बोलावून आजपर्यंतच्या परंपरेला तडा देण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे.
कसबा बावडा येथे सभा घेण्याचं नेमकं कारण काय, गोकुळच्या संस्था प्रतिनिधींनी तुमच्या गैरकाराभरावर बोलू नये त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी बावड्यात सभा घेतली का, गोकुळच्या आवारात जागा असताना बाहेर नाहक खर्च करून नेमकं काय साध्य करायचं आहे. वर्षभराच्या गलथान कारभारामुळे बावड्याच्या बाहेर लोकांना सामोरं जाण्याचं धाडस उरलेलं नाही का, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी सर्व सभासदांना द्यावीत, असे मुद्दे उपस्थित केले आहेत.
संघाच्या आवारात सभा घेणं अपेक्षित असूनही जर बावड्यातच सभा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हट्ट असेल तर त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, त्यांचं हे दबावतंत्र निश्चितपणे मोडीत निघेल. स्वभिमानी दूध उत्पादक बावड्यात येऊन संस्थेचा हिशेब विचारायला कमी करणार नाहीत. कितीही पळवाटा शोधल्या तरी शेवटी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.