Telangana Assembly Election : ... म्हणून महाराष्ट्रातील 14 गावं तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार!

Telangana Election Voting : जाणून घ्या, नेमकी कोणती गावं आहेत आणि कसं काय मतदान करू शकणार?
Telangana Election Voting
Telangana Election VotingSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : तेलंगणा विधानसभेच्या 199 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या प्रचाराशी संबंधित एक विशेष गोष्ट म्हणजे निवडणूक जरी तेलंगणा विधानसभेची असली, तरी यासाठी महाराष्ट्रातही प्रचार सुरू आहे. कारण, या निवडणुकीत महराष्ट्रातील जवळपास चार हजार मतदार मतदान करणार आहेत.

होय हे खरं आहे, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 14 गावे अशी आहेत, जी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे सध्या गावांमध्येही तेलंगणा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील जिवती तालुक्यातील ही 14 गावं असून, या गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार अधिकार सांगत आहेत. एवढच नाही तर येथील ग्रामस्थांकडे दोन्ही राज्यातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आहेत. त्यामुळे हे ग्रामस्थ दोन्ही राज्यांमधील निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदान करणारी 14 गावे कोणती? -

मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती,अंतापुर, इंदिरानगर, येसापुर,पलसगुडा,भोलापठार, लेंडीगुडा अशी तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या 14 गावांची नावे आहेत.

या 14 गावांमधील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी तेलंगणा सरकारकडून विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा कल तेलंगणाकडे दिसून येतो. विशेष म्हणजे गावांची प्रमुख मागणी वन जमिनीचे पट्टे मिळण्याबाबची असून, तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मात्र यामध्ये ग्रामस्थाना अपेक्षित मदत मिळालेली नाही.

Telangana Election Voting
Telangana Election : तेलंगणात दिग्गज नेत्यांचे 'सेम टू सेम' नाव असलेले उमेदवार !

तेलंगणा राज्यात विधानसभेच्या 119 मतदारसंघात 31 जागा राखीव असून त्यामध्ये 12 जागा एसटी आणि 19 जागा एससीसाठी राखीव आहेत. तर 88 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. विधानसभेची निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com