कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. संजय राऊत, गुलाबराव पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल यांच्या घरची लगीनघाई नुकतीच संपली आहे. तर आता जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. अशातच आता शिवसेनेचे आणखी दोन नेत्यांच्या घरी लगीन घाई असून ते एकमेकांचे व्याही झाले आहेत.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांची द्वितीय कन्या देविका यांचा विवाह मुंबईचे शिवसेना आमदार आणि उद्योजक रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांचा मुलगा प्रणय यांच्याशी झाला. मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात या हॉटेलात हा दिमाखदार सोहळा पार पडला. प्रणय हे नामांकित हॉटेल व्यवसायिक आहेत.
या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कृषी मंत्री दादा भुसे, अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत (Sanjay Raut), आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर असे सगळे दिग्गज नेते हजर होते.
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते अभिनेता सलमान खानची उपस्थिती. सलमान खानने खास विवाह सोहळ्यासाठी रविंद्र फाटक यांच्याकडून पाहुणा म्हणून उपस्थिती लावली होती. याशिवाय अभिनेता सुनील शेट्टीही उपस्थित होता. माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार रवींद्र फाटक, गोकुळचे संचालक अजित नरके, देवराज नरके, राजवीर नरके यांनी स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.