`शेटजींचा पक्ष` ही टीका मोडून काढण्यासाठी मोदींची एक हजार रुपयांची देणगी

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः १ हजार रूपयांची देणगी देऊन अभियानाचे उद्घाटन केले.
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi Bjp ‘micro donation’ campaign

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi

Bjp ‘micro donation’ campaign

Sarkarnama

नवी दिल्ली : श्रीमंत-अतिश्रीमंताचा पक्ष ही ओळख बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आता पावलं उचलालयला सुरुवात केलेली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपने आजपासून छोट्या रकमेच्या देणग्या स्वीकारण्याची विशेष मोहीम (Bjp ‘micro donation’ campaign) सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः १ हजार रूपयांची देणगी देऊन अभियानाचे उद्घाटन केले. प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांला आपला पक्ष वाटावा यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर या अभियानाचा भाजपला नेमका फायदा होणार का? असा सवाल विचारला आहे.

मोदी सरकारने निवडणूक निधींच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा दावा करून इलेक्टोरल फंड हा नवा प्रकार सुरू केला, मात्र तो वादात सापडला. याद्वारे राजकीय पक्षांना उघडपणे देणग्या देण्याचा मार्ग भांडवलदारांना मोकळा झाला. मागच्या ७ वर्षात केंद्रासह अनेक राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला एकूण किती देणगी मिळाली याची आकडेवारी अन्य पक्षांप्रमाणे दरवर्षी जाहीर होते. मात्र भाजपला कोणी आणि किती देणगी दिली याची माहिती हवी असल्यास ती मिळण्याची शक्यता धूसर असते. यामुळेच इलेक्टोरल फंडावर विरोधक सातत्याने आरोप करतात.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi

Bjp ‘micro donation’ campaign

फडणवीस, दानवेंची भाजपला भली मोठ्ठी देणगी!

त्यामुळे आता निवडणूकीच्या तोंडावर केवळ श्रीमंत- अतीश्रीमंतांकडूनच देणगी मिळविणारा पक्ष अशी प्रतिमा बदलण्याच्या हालचाली भाजपने सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त (Atal bihari vajpayee birth anniversary) भाजपने आजपासून छोट्या रकमेच्या देणग्या स्विकारण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीला दीनदयाळ उपाध्याय जयंतीपर्यंत ही मोहिम चालणार आहे. भाजप नेते व सर्वसामान्य लोकांकडून पक्षाला देणगी मिळावी, यादृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. सामान्य लोकांना नमो अॅपद्वारेच (NAMO App) भाजपला देणगी देता येणे शक्य होणार आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi

Bjp ‘micro donation’ campaign

अध्यक्षपदासाठी नाव जाहीर होण्यापुर्वीच नानांनी पृथ्वीराज चव्हाणांना भरवला केक...

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटनानंतर आपण देणगी दिल्याची पावती ट्विट करत म्हटले की, मी पक्षनिधीसाठी १ हजार रूपयांचे योगदान दिले आहे. "राष्ट्राचे स्थान सर्वोच्च असते" या आमच्या आदर्शाला तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून निस्वार्थ सेवाभावी वृत्तीच्या संस्कृतीला आपल्या सूक्ष्म दानाच्या सहाय्याने मजबूत केले जाईल. यामुळे भाजपला व भारताला मजबूत करण्यासाठी आपणही मदत करा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी सांगितले की या नव्या मोहीमेद्वारे भाजप कार्यकर्ते लाखो लोकांना पक्षाबरोबर जोडतील. नमो अॅपवरील डोनेशन मोड्यूलच्या माध्यमातून सामान्यांना देणग्या देता येतील. जगातील या सर्वांत मोठ्या राष्ट्रवादी विचारसरणीला (अभियान) मजबूत करण्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे, असे आवाहन मी लोकांना करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com