Lok Sabha Election : 2019 ची पुनरावृत्ती, 'पवार पॅटर्न' पुन्हा चर्चेत; 'या' नेत्यांच्या पावसात सभा

Sharad Pawar Satara Meeting: 2019 सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांनी भर पावसात घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. या सभेनंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं चित्र बदललं होतं. पवारांनी पावसात घेतलेल्या या सभेची आजही चर्चा होत असते.
Sanjay Jadhav, Sharad Pawar, Praniti Shinde
Sanjay Jadhav, Sharad Pawar, Praniti Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. उमेदवार कधी मतदारांच्या घरात जाऊन जेवण करताना दिसत आहेत, तर कधी ते मतदारांच्या शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. पण सध्या महाराष्ट्रात प्रचारासाठी 'शरद पवार पॅटर्न' मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (Sharad Pawar Pattern)

2019 सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांनी (Sharad Pawar) भर पावसात घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. या सभेनंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं चित्र बदललं होतं. साताऱ्याच्या (Satara) या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांचा दणदणीत विजय झाला. 2019 ची लोकसभा पोटनिवडणूक पार पडली परंतु, त्यावेळी शरद पवारांनी पावसात सभा घेतल्याची चर्चा आजही होत असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच नुकतेच महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांनी पवारांचा भरपावसातील भाषणाचा फंडा वापरल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur Lok Sabha Constituency) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि परभणी लोकसभा (Parbhani) मतदारसंघाचे उमेदवार संजय जाधव यांनी भर पावसात सभा घेतली, यामुळे पुन्हा एकदा लोकांना पवारांच्या 2019 मधील सातारच्या सभेची आठवण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय जाधव राजेश टोपेंचं भर पावसात भाषण!

परभणी लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. महाविकास आघाडीचे संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि महायुतीचे महादेव जानकर यांच्यात इथे मुख्य लढत आहे. याच प्रचारादरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार जाधव यांची घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे सभा आयोजित केली होती.

Sanjay Jadhav, Sharad Pawar, Praniti Shinde
Supriya Sule Vs Ajit Pawar : 'काय चुकलं तिचं? भाऊ फितूर झाला; स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला'

या सभेत पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी संजय जाधव यांनी न थांबता आपलं भाषण सुरू ठेवलं, ते बोलायचं थांबले नाहीत. शिवाय या सभेला राजेश टोपेंसह (Rajesh Tope) अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे या पावसात राजेश टोपेंनी यांनीदेखील भर पावसात भाषण ठोकलं. या नेत्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहून शरद पवारांची आठवण आली अशा कमेंट काही कार्यकर्ते या व्हिडिओवर करत आहेत.

Sharad Pawar, Praniti Shinde, Sanjay Jadhav
Sharad Pawar, Praniti Shinde, Sanjay JadhavSarkarnama

प्रणिती शिंदेंची भर पावसात कॉर्नर सभा!

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) रिंगणात उतरल्या आहेत. तर महायुतीकडून आमदार राम सातपुते (Ram Satpute) निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. अशातच काल सोलापुरातील (Solapur) बाळे येथे प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा झाली.

Sanjay Jadhav, Sharad Pawar, Praniti Shinde
Lok Sabha Election: मोदी हा चेहरा नाही, तर भुताटकी; संजय राऊतांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा सुरू असतानाच अचानक पावसाला सुरूवात झाली. पाऊस पडलायला सुरुवात झाल्यामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. परंतु, प्रणिती शिंदे यांनी पाऊस पडत असतानाही आपलं भाषण थाबंवलं नाही. शिंदे यांनी भर पावसातही भाषण सुरु ठेवल्याने उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली. त्यामुळे सध्या उमेदवार प्रचारासाठी पवाराचा पॅटर्न वापरत असल्याची चर्चा रंगली आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com