Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड आणि भाजपमध्ये संघर्ष पेटणार; छत्रपती संभाजीनगरमध्ये पडली ठिणगी

A case has been registered against Jitendra Awhad : राज्य सरकारविषयी जनमानसात प्रतिमा मलिन होईल, असा चुकीचा अध्यादेश ट्विटवर पोस्ट केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते, माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

राज्य सरकारविषयी समाज माध्यमांवर चुकीची माहिती प्रसारीत केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झाल्याने महायुती सरकारने त्यांना घेरणार, असे दिसते. तसंच भविष्यात जितेंद्र आव्हाड आणि महायुती सरकारमध्ये संघर्ष तीव्र होण्याचे हे संकेत आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहविभाग खाते आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची तत्परता दाखवल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, जितेंद्र आव्हाडविरुद्ध भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष अधिक पेटणार, असेच हे संकेत आहेत.

तक्रारदाराची तक्रार

छत्रपती संभाजीनगरमधील विजय काळुंके (वय 27, रा. म्हाडा काॅलनी, मूर्तीजापूर चिकलठाणा) या युवकाने फिर्याद दिली आहे. 'आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद, महसूल व वन विभागाने काढले परित्रक, 'लाडकी बहीण'चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना? शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे लाडकी बहीण योजनेला', असे ट्विट करत सरकारने काढलेले परिपत्रक जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे. या ट्विटची शहानिशा केल्यावर माहिती चुकीची आहे, असे समजल्यावर विजय काळुंखे या युवकाने आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली.

तक्रारदाराची कारवाईची अपेक्षा

माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटमुळे मयत शेतकऱ्यांचे वारसदार, नातेवाईक शेतकरी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब महिला यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या ट्विटमुळे योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांमध्ये नैराश्य येईल, आणि सरकारविरोधात उठाव करावा, सरकार विरोधात खोटे आंदोलन उभे रहावे, असा हेतू दिसतो. येणाऱ्या काळात सण-उत्सवामध्ये महाराष्ट्र राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना निधी बंद महसूल आणि वन विभागाचे परिपत्रक काढले नसताना चुकीची माहिती ट्विटवर प्रसारीत करत सरकारची जनमानसात बदनामी केली आहे, असे विजय काळुंखे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद घेतली आहे. भादवि 353 (2) नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विजय काळुंखे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे. माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती भाजप सरकारविरोधात संघर्ष तीव्र आहे. जितेंद्र आव्हाड आक्रमकपणे सरकारवर हल्लाबोल करतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना सरकार घेरणार, असे दिसते. दरम्यान, फिर्याद देणार युवक नेमका कोण आहे आणि तो म्हाडामध्ये राहतो, त्यामुळे त्या युवकाची चर्चा देखील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com