

इंडिया आघाडीची आज बैठक पार पडली. उद्धव ठाकरे हे या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने हजर होते. या बैठकीनंतर इंडिया आघाडीला नवा भिडू भेटणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे इंडिया आघाडीत सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांचे बंड शमले. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. प्रसाद हिरे यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नवी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींचं कौतुक केले. ठाकरेंनी ममतादीदींचा 'शेरनी' असा उल्लेख केल्याची चर्चा आहे. या विषयीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. या बैठकीत इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये आगामी रणनीतीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली, या बैठकीला उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थिती नव्हते. त्यांनी ऑनलाईन ही बैठक अटेंड केली. यावर बोलताना शिरसाट यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीत राहायचं नाहीये, त्यांची ही ठरलेली नीती आहे. त्यामुळेच त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून बैठक अटेंड केली. हातचं राखणं ही पद्धत शिवसेना ठाकरे गटाने राबवली आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
बीड आणि जालना जिल्ह्यातील एकाच दिवसात झालेल्या दोन लाचखोरीच्या प्रकरणाने महाराष्ट्रातील भ्रष्ट प्रशासकीय सेवेचा दाखलाच समोर आणला. आता, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या गाजलेल्या लाच प्रकरणात चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे, याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. अंबड लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालन्यातील गोंदी पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल होते, याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रसाद हिरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला. मालेगाव शहराच्या विकासासाठी मंत्र्यांनी शब्द दिल्याचा दावा प्रसाद हिरे यांनी यावेळी केला.
जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीला आग लागली आहे. ही कंपनी कुलर निर्मितीची आहे. या भीषण आगीनंतर कंपनी परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याचं दिसून आलं. आगीचं कारण समोर आलेलं नाही. मात्र, आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे विरोधकांकडून सातत्यानं पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आळंदी मरकळ रस्त्यावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार, या पार्टीत मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी उपस्थित होते. पोलिसांनी केलेल्या छापेमारीवेळी रेव्ह पार्टीवर सर्व तरुण तरुणी नशेत असल्याचंही समोर येत आहे.
- भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांना सोबत घेऊन मंत्री दादा भुसे गिरीश महाजनांकडे दाखल
- गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर बैठक सुरू
- बैठकीला उदय सामंत देखील उपस्थित
- प्रसाद हिरे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार का ? याकडे लक्ष
गेल्या महिनाभरापासून पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीचे बिल निघत नसल्याने संतापलेल्या मंगेश साबळे यांनी आज थेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गाठली. यावेळी "मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला न भेटता गाडी पुढे घेतली, तर गाडी फोडून टाकेन," असा थेट दमच त्यांनी दिल्याने जिल्हा परिषद परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
काँग्रेस पक्षाला एक प्रश्न आहे की घोडेबाजार किंवा ऑफर ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारालाच का दिली जाते? काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य विकाऊ आहेत, कारण की विकास असते त्याचीच किंमत ठरते. आपल्या मतदाराची किंमत ठरवून स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार आहे ते विकावं असा आरोप करत आहे म्हणजे स्वतःच पक्षावर आरोप करत आहेत, अशी टीका भाजप आमदार परिणय फुके यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घडामोडीत उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. ठाकरे बंधूंच्या या भेटीकडे राज्यातील सर्व पक्षांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
नागपूर येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक संकटावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. देशातील तरुणांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नांवर संयुक्तपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रातील शेतकरी नुकसान, पाणीटंचाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांवर सरकारवर टीका करत तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही त्यांनी केली.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या बनावट पुजारी आणि एजंटांविरोधात मंदिर संस्थानने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत पथकाने 5 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यापैकी 2 जणांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. उर्वरित तिघांची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आले आहेत.
काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासातील त्याग आणि मेहनतीचे कौतुक केले. ते नाराज आहेत की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत बोलताना त्यांनी वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभाग चौथा मजला येथील कार्यालयात सकाळी किरकोळ आग लागली होती. ही आग आटोक्यात आणली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद उफाळला आहे. युरियासाठी शेतकरी आक्रमक होत गोंधळ घातला आहे. अकोट तालुक्यात युरियाचा 200 पोते माल आल्याने दुकानदाराकडून प्रत्येकी शेतकऱ्याला एक पोत देण्यासाठी मागणी सुरू होती. यातून हा वाद उफाळला. वाद मिटवण्यासाठी पोलिस आणि आरसीपी पथक दाखल झाले असून, कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकान उघडण्याची वेळ होण्यापूर्वीच पहाटे चार वाजल्यापासून अनेक शेतकरी दुकानासमोर रांगेत उभे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या हद्दीत मोठी कारवाई करत, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला तब्बल 1 कोटी 27 लाख 54 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून एका सहाचाकी कंटेनरसह मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.
"ज्या पद्धतीचं, विचाराचं सरकार देशात आणि वेगवेगळ्या राज्यात आलेले आहे, ते सरकार संविधानाला सुसंगत नाही. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून रोखठोकपणे त्यांनी संविधानाचा विरोध केला. आज त्या संविधानाचं नाव घेतल्याशिवाय आपला सत्तेमधला मार्ग प्रशस्त होत नाही, म्हणून फक्त ते संविधानाचे नाव घेतात, याचा अर्थ त्यांना संविधानाबद्दल प्रेम आहे असे होत नाही", असे परखड मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांनी व्यक्त केले. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अन् विवेक जागर संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारणीच्या बैठक झाली. लक्षवेधी व शतकवीर पुरस्कार वितरणही या वेळी झाले. महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे अध्यक्ष स्थानी होते. राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सल्लागार बाबा आरगडे, रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड व्यासपीठावर उपस्थित होते.
जळगाव गेल्या तीन-चार दिवसांत सलग रावेर, चोपडा, यावल व मुक्ताईनगर या चार तालुक्यांत वादळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चार दिवसांत चारही तालुक्यांतील सुमारे चार हजार हेक्टरवरील केळीबागा उद्ध्वस्त झाल्या. सुमारे 800 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. केळीपट्ट्यांचे आर्थिक कंबरडेच त्यामुळे मोडले. उद्ध्वस्त झालेल्या केळी उत्पादकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली जात आहे.
बीडच्या परळीतील तौहीद खान हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या वेळी पोलिस प्रशासनाला प्रकरणातील कुठलाही आरोपी सुटला नाही पाहिजे, कोणाचेही गय केली जाणार नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शहरातील अवैध धंदे नशेबाज अड्डे एका आठवड्याच्या आत पूर्णपणे बंद करा, अशा सूचना मुंडे यांनी केल्या आहेत. तसेच पीडित कुटुंबाची सर्वस्व जवाबदारी धनंजय मुंडे यांनी स्वीकारली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती बसस्थानकाची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसेच चालक-वाहकांमधील अव्यवस्था पाहून मंत्री प्रताप सरनाईक संतप्त झाले. परिसरातील ढिसाळ व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले.
समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ आज पहाटे सुमारे 4 वाजताच्या दरम्यान खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. तर बाकी प्रश्न मेहेकर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. अपघाताची तीव्रता एवढी होती की अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते मात्र पोलिसांनी तातडीने त्यांना बाहेर काढले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 2026-2031 ही पंचवार्षिक निवडणूक मुंबईसह कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि सोलापूर या पाच मतदान केंद्रांवर आज पार पडली. महामंडळाच्या तीन हजार 403 मतदारांपैकी एक हजार 698 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 49.90 टक्के मतदानाची नोंद झाली. मुंबईमध्ये 34.27 टक्के, तर कोल्हापूर 69.86 टक्के, पुणे 63.10, सोलापूर 58.88 टक्के तसेच नाशिक 46.85 टक्के मतदान झाले. आज सोमवारी कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी हाॅलमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निर्णय अपेक्षित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.