Maharashtra News Live Update : सोलापूरमध्ये अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिली: धैर्यशील मोहिते पाटील

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. यासह आज दिवसभरातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

कंत्राटीकरण, पीपीपी तत्त्वावर मालमत्तांचा पुनर्विकासाला विरोध करत उद्यापासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी उद्यापासूनच संपाचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीज आणि बससेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. मात्र, जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून राज्य सरकारने 'अत्यावश्यक सेवा कायदा' लागू करत संपावर बंदी घातली आहे.

ओमराजे यांचे तीन हजार फाॅलोअर्स घटले

खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. अशातच अवघ्या चार दिवसांत त्यांचे तब्बल 6 हजार फेसबुक फॉलोअर्स घटले आहेत. सध्या सोशल मीडियावर ओमराजेंना जोरदार ट्रोल केले जात आहे

फुटलेल्या खासदारांना वाय प्लस सुरक्षा

ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना धोका आहे असल्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाने वर्तवली आहे. गुप्तवार्ता विभागाकडून स्थानिक पातळीवर Y+ दर्जाच्या सुरक्षेसमान बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा संदेश सहाही खासदारांना देण्यात आले आहेत.

Dhirysheel Mohite-Patil : महाविकास आघाडीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास

विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतांनी सुरुवात केली होती. पण 22 तारखेला आमचा विजय होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्या सोबत होती. अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिल्याचा दावा देखील मोहिते पाटलांनी केला. 22 तारखेला मतदानाची आकडेवारी तुम्हाला समजेल. या दुष्काळमध्ये वसंत बहरेल अस मोहिते पाटील म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीसाठी संभाजीनगर, जालना जिल्ह्यात ९८.९० टक्के मतदान 

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात ९८.९०% मतदान झाले. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील एकूण १३ मतदान केंद्रांवर आज सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ६३७ मतदारांपैकी ६३० मतदारांनी मतदान केले. यामध्ये ३०८ महिला तर ३२२ पुरुष सदस्य मतदान केले. ४ वाजता मतदान संपल्यानंतर मतपेट्या या मतमोजणी केंद्रातील स्त्रोंग रूमकडे पाठवण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Uddhav Thackeray news : उद्धव ठाकरेंनी बैठक बोलविली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंकडून बैठकांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.

Sanjay Raut news : सहा खासदार राजस्थानमध्ये

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा बंडखोर खासदारांना राजस्थानमध्ये सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यासाठी अतिरिक्त १० कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut news : आता आमचं ऑपरेशन तुडवा - संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी सहा बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलात, आता राजीनामा द्या. त्यांच्या पक्षातून निवडणूक लढवा. टायगर कधी लपत नाहीत, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. आता आमचं ऑपरेशन तुडवा असेल, असा सूचक इशाराही राऊतांनी बंडखोर खासदारांना दिला आहे.

Omraje Nimbalkar news : ओमराजेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. त्यापैकी एक असलेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवसैनिकांकडून आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने हा बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे समजते.

20 जूनला मुंबईत मनसेचा मेळावा; पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 जून रोजी मुंबईत मोठा मेळावा होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिका, संघटन बळकटीकरण आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असून, महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा होण्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मंत्रालयात शेतकऱ्याचे आंदोलन; झाडावर चढून सरकारचे वेधले लक्ष

मुंबईतील मंत्रालय परिसरात एका शेतकऱ्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. संबंधित शेतकरी झाडावर चढल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्काळ दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

परभणीत खासदार संजय जाधव यांची सुरक्षा वाढली; Y+ संरक्षण लागू


खासदार संजय जाधव यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश जारी केले आहेत. ते परभणीत दाखल होताच पोलीस प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था तात्काळ लागू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे.

एक तासापासून ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक सुरु, पण सहाही बंडखोर खासदार गैरहजर

 उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्षाच्या  संसदीय बैठकीला लोकसभेचे तीनच खासदास उपस्थित आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाझे हे उपस्थित आहेत. तर राज्यसभेचे खासदार संजय राऊत हेही उपस्थित आहेत.

परभणीत खासदार संजय जाधव यांच्या घरासह कार्यालयाची सुरक्षा वाढवली; स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून, 'जनात शिवसेना मनात शिवसेना', 'वसा शिवसेनेचा ध्यास महाराष्ट्राचा' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मातोश्रीच्या परिसरात बॅनरबाजी करून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृहाचा अन्न परवाना निलंबित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रेफेक्टरी) चालविणाऱ्या मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेसचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. 'एफडीए' चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली.

अमेरिका आणि इराणने केल्या सामंजस्य करारावर सह्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर (एमओयू) औपचारिकपणे स्वाक्षरी केल्याची माहिती दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अमरावती शहर काँग्रेसची विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका

अमरावती शहर काँग्रेसने अमरावती विधानपरिषद निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेचे 17 ही नगरसेवकांना निवडणुकीमध्ये मतदान करणार नाहीत. कारण काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना तसा व्हीप जारी करून आदेश दिले आहेत.

फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात - पृथ्वीराज चव्हाण

भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे निवडणुका जिंकू शकत नसल्यानेच देशात लोकशाही धोक्यात आली असून केंद्र सरकार विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून पक्ष फोडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केला आहे.

विधानपरिषदेच्या या ११ जागांसाठी आज मतदान होणार

विधानपरिषदेच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या ठिकाणच्या जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर या मतदानाचा निकाल 22 जून रोजी जाहीर केला जाणार आहे.

सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध

 राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर एकूण 11पैकी तब्बल सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com