Eknath Shinde Dasara Melava 2023 : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

Dasara Melava 2023 : एका ट्रकच्या धडकेने शिवसैनिकांच्या या गाडीला अपघात झाला आहे.
Accident News
Accident News Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Latest News : आज विजयादशमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित केला गेला आहे. सायंकाळी पार पडणाऱ्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिंदे यांचे समर्थक मुंबईत दाखल होत आहेत. आता या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुका येथून निघालेल्या एका वाहनाला रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या शिरढोण या गावाजवळ भीषण अपघात झाला. एका ट्रकच्या धडकेने शिवसैनिकांच्या या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती मिळत आहे.

Accident News
NCP VS BJP Twitter War: शरद पवार-चंद्रशेखर बावनकुळेंवरील टीकेवरून राष्ट्रवादी अन् भाजपात ट्विटर वॉर
Accident News
PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

मुंबईतील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सायंकाळी पार पडत आहे, तर त्याचवेळी दादर येथील शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com