Nana Patole and Aditya Thackeray : ...अखेर आदित्य ठाकरे, नाना पटोलेंसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

Opposition MLAs take oath : काल विधिमंडळात शपथ घेण्यास दिला होता निकार; जाणून घ्या काय सांगितलं होतं कारण?
Aditya Thackeray and Nana Patole
Aditya Thackeray and Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole and Aditya Thackeray Opposition MLAs take oath : महाराष्ट्र विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाची सुरूवात काल झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आमदारकीची शपथ घेण्यास नकार दर्शवत, सभात्याग केला होता. मात्र त्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अखेर त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली होती.

विधानसभेचे प्रोटेम स्पीकर कालीदास कोलंबकर यांनी सर्व यांनी सर्वांना आमदारकीची शपथ दिली होती. सत्राच्या पहिल्या दिवशी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा दुरुपयोग झाल्याचा आरोप केला होता आणि शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. सर्व विजयी सदस्यांनी आज म्हणजे रविवारी आमदारकीची शपथ घेतली.

आज काँग्रेस नेते नाना पटोले(Nana Patole), विजय वडेट्टीवार अन् अमित देशमुख यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंनी आमदारकीची शपथ घेतली.

Aditya Thackeray and Nana Patole
Pawar Vs Bawankule : पवारसाहेब, मारकडवाडी कोणाची मक्तेदारी नाही, ही बघा आकडेवारी; बावनकुळेंनी सुनावले

तर शनिवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी म्हटले होतेकी, ते सोलापूरच्या माळशिरस विधासभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात कर्फ्यू आणि अटकेच्या विरोधात विरोध प्रदर्शन करत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी बॅलेट पेपर्सचा वापर करून पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे.

Aditya Thackeray and Nana Patole
Ramdas Athawale Video : 'निवडणुकीत हवा गेली, राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नाही', रामदास आठवलेंनी लगावला टोला

याशिवाय आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शनिवारी म्हटले होते की, आमचे निवडून आलेले आमदार शपथ घेणार नाहीत. जर हा जनादेश असता तर लोक खूश असते आणि जल्लोष करत असते, मात्र या विजयाचा लोकांनी कुठेही आनंद साजरा केला नाही. आम्हाला निवडणुकीच वापर झालेल्या ईव्हीएमवर संशय आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com