Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची कोंडी; थेट नाशिकच्या रस्त्यावर उतरणार!

Aditya Thackeray Vs Ekanth Shinde Nashik Pothole Issue : सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेची नाशिकमधील खड्ड्यांप्रश्नी कोंडी झाली आहे. त्यातच आदित्य ठाकरे हे आज नाशिक शहरातील रस्त्यांची पाहणी करत शिंदेंच्या विरोधात वातावरण अधिक पेटवणार असल्याची चर्चा आहे.
Aditya Thackeray Nashik road protest
Aditya Thackeray Eknath Shinde political clashSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray Nashik political news: नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न पेटला आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका होते आहे. वाहतुकीसाठी बंद केलेले रस्ते आणि खड्डे यात 6 नागरिकांचा बळी गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज महापालिके विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडे गेले काही दिवस शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सातत्याने या प्रश्नावर वातावरण तापवले आहे. महासभेत या विरोधात आवाज उठविण्यात आला.

शहरातील नागरिकांची ही समस्या ओळखून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत आज शहराचा दौरा करीत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील विविध भागाच्या खड्ड्यांची पाहणी करतील. नागरिकांशी चर्चा करणार आहेत.

खड्ड्यांचा प्रश्न तीव्र बनल्याने सुरुवातीला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने देखील भाजप विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा पक्ष सत्तेत असल्याने त्यांच्या विरोधाला मोठी धार नव्हती. त्यांची ही अडचण ठाकरे गटाने हेरली आहे.

यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मंत्री गिरीश महाजन, महापौर आणि महापालिका आयुक्तांना थेट टार्गेट केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून येत्या 17 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी वातावरण तापविण्यासाठी शिवसेनेचे नेते आज शहरात दाखल होत आहेत.

Aditya Thackeray Nashik road protest
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या आदेशाने सभा घेतली, झंझावाती भाषणानंतर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्तता, शिवसेना नेत्यालाही दिलासा

यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भूमिका घेण्यावरून राजकीय कोंडी करण्यात ठाकरे पक्ष यशस्वी झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची ही अडचण हेरुन या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्नावर शहरातील राजकारण तापले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने त्यात आघाडी घेतली आहे.

Aditya Thackeray Nashik road protest
NMC Politics: खड्ड्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचा बिनतोड सवाल, आजवर कोणावर गुन्हा दाखल केला ते सांगावे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com