Sachin Sawant : भाजप आणि संघाकडून देशात 'संघ जिहाद', 'खुर्ची जिहाद'; काँग्रेस नेते सावंत यांचा हल्लाबोल

Congress Spokesperson Sachin Sawant criticism of BJP Devendra Fadnavis Love Jihad statement : भाजप नेते, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहाद, लँड जिहाद आणि वोट जिहादवरून केलेल्या विधानावर काँग्रेस नेते, प्रवक्ता सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला.
Sachin Sawant
Sachin SawantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते तथा राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लव जिहाद'च्या माध्यामातून लाखो हिंदू मुलींची फसवणूक झाली.

'लँड जिहाद' आणि 'वोट जिहाद' यावर देखील त्यांनी भाष्य केलं. यावरून काँग्रेस नेते प्रवक्ता सचिन सावंत यांनी भाजप आणि संघ परिवारावर हल्लाबोल चढवला आहे.

सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, "गेली दहा वर्ष भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून 'लव जिहाद', 'वोट जिहाद', 'लँड जिहाद', असे शब्द वापरले जात आहे. भाजप आणि 'RSS'चा दहा वर्षात देशात प्रोजेक्ट चालू आहे, या प्रोजेक्टचं नाव आहे 'संघ जिहाद'! देशात संघाचा विचार पसरविण्यासाठी द्वेष पसरवणं, मुस्लिमांना टार्गेट करण्याचा भाग आहे". महाराष्ट्रात अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. तशी ख्याती झाली आहे, असा टोला देखील काँग्रेस (Congress) सचिन सावंत यांनी लगावला.

Sachin Sawant
Congress Vs BJP : '2029 ला महाराष्ट्रात नव्हे दिल्लीतही भाजपचं सरकार नसेल...', शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचं प्रत्युत्तर

'लोकसभा निवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव झाला आहे. विधानसभेला देखील पराभव दिसू लागला आहे. त्यातून 'वोट आणि लव जिहाद' शब्दांचा प्रयोग केला जात आहे. आता त्यांचा 'खुर्ची जिहाद' सुरू आहे. खुर्चीसाठी सगळ्या गोष्टी केल्या जात आहे. आमदार नीतेश राणे, रामगिरी महाराज यांची, जी विधान आहेत, ती महायुतीची खुर्ची बचाव अंतर्गत येतो. देशातील 'संघ जिहाद'ला काँग्रेस ठामपणे उत्तर देईल', असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Sachin Sawant
Congress News : काँग्रेसचं जागावाटप कधी? विजय वडेट्टीवारांनी थेट तारीखच सांगितली

भाजप नेते फडणवीस काय म्हणाले होते

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर इथल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी 'वोट जिहाद'वर भाष्य केले. "देशात पुन्हा एकदा सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. हे अनेकांना पहावत नाही. त्यामुळे हिंदू विरोधकांनी हिंदू विरोधी जागतिक वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले आहे. 'लव जिहाद' पाठोपाठ 'वोट जिहाद'चा प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले. त्यामुळे संत शक्तीने हिंदू विरोधकांच्या मुकाबला करण्यासाठी पाठबळ द्यावे", असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लव जिहादच्या माध्यमातून लाखो हिंदू मुलींचं आयुष्याचे नुकसान केले गेले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com