Maharashtra and National News: पंतप्रधान मोदीही अहमदाबादला जाणार

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान मोदी अहमदाबादला जाणार

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह अहमदाबादेत दाखल झाले आहेत. तर आता पंतप्रधान मोदीही अहमदाबादला जाणार असल्याची माहिती सी.आर. पाटील यांनी दिली आहे.

टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना एक कोटींची मदत

अहमदाबाद दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप १ कोटी रुपये देणार आहे. शिवाय, जखमींच्या वैद्यकीय खर्चाचीही आम्ही जबाबदारी घेऊ आणि त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत मिळेल याची खात्री करू. आम्ही बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे

एकजण बचावला

अहमदाबादेतील विमान दुर्घटनेत एक प्रवासी बचावला आहे. रमेश विश्वकुमार असे त्याचे नाव असून तो गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या तातडीचे उपचार सुरू आहेत. ११ ए या जागेवर तो बसलेला होता.

विमान अपघातात MBBSच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अहमदाबादेतील विमान अपघातात एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आयएएम कडून दिली गेली आहे.

भारतीय सैन्याचे १३० जवान रवाना

अहमदाबादेतील विमान दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यातील १३० जवान देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

अमित शाह घेणार आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहमदाबादेतील विमान दुर्घटनेचा संपूर्ण बारकाईने आढावा घेणार आहेत. यासाठी ते दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. अपघातमधील मृतांची ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.

अहमदाबाद विमान अपघातात सर्व प्रवशआंचा मृत्यू - एपी वृत्तसंस्था

अहमदाबादेत घडलेल्या भीषण विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्तसंस्थेने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com