

उद्धव ठाकरे हे बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात गेले आहेत. तेथे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या समोर आपले म्हणणे मांडले
उद्धव ठाकरेसाहेब, आदित्य ठाकरे यांच्या बाबात माझ्या मनात वाईट शब्द आला नाही. कार्यर्त्यांना सांगितले कुठल्याही प्रकारची कमेंटमध्ये मातोश्री बद्दल करू नका. एकही शब्द जायला नको., असे ओमराजे म्हणाले.
सोमवार (ता.22) पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून त्याआधी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. तसेच पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार आरोप केले होते. यावरून सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद घेत त्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देत हे पावसाळी अधिवेश तीन आठवडे चालणार आहे. यावेळी विरोधकांनी चहापानासाठी येत चर्चा केली असती तर सामान्यांचे प्रश्न कसे सोडवता आले असते असा टोला लगावला आहे.
शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत अखेर ठाम भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरिपालयम येथे वायूगळतीमुळे सात लोकांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रकृतीत बिघाड झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार्या लेपन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी याचिका येथील भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी येथील जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवसापूर्वी न्यायालयात सुनावणी होऊन भीमाचार्य वरखेडकर यांचा न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळला आहे. दरम्यान मंदिर महासंघाचे गणेश लंके यांच्या अर्जावर उद्या (ता.22) न्यायालयात निर्णय होणार आहे,अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. तर येत्या 22 ते 24 जून दरम्यान मुर्तीवर पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीवर लेपन प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी 22 व 23 जून असे दोन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला असून, त्यासाठी राज्यातील पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकने मागवण्यात आली आहेत. इच्छुक आणि पात्र शिक्षकांनी येत्या १० जुलैपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे थेट आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) दि. 20 जून ते 30 जून 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
माझ्याशी संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याबाबत स्पष्टीकरण होणं गरजेचे आहे म्हणून मी खुलासा करत आहे. माझ्यासोबत फोटोत दिसणारी मुलगी आहे, तिचे वडील माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. माझ्या मुलीसोबत ती असते. मुंबईतील गणेशोत्सवाच्या काळातही ती आमच्या घरी येते. ते फोटो क्रॉप करून, मार्फ करून एआयच्या माध्यमातून फक्त आमच्या दोघांचेच फोटो एकत्र करून व्हायरल केले आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
नगरपंचायतीच्या पार पडलेल्या वार्ड क्रं.१० च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज ( ता.२१) तहसील कार्यालयात पार पडली. भाजपच्या उमेदवार रूपाली अजय बुधे यांनी ५३ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे उमेदवार अल्केश बुधे यांचा पराभव झाला. वहिनी आणि दिरामध्ये लढत होत असल्याने मतदारांचे लक्ष लागून होते. मतदारांनी मात्र वहिनींना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
तुमच्या नेतृत्वावर आमची निष्ठा पक्की, एक गाव एक नेता एक विचार ओमराजे असा फलक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीत झळकला आहे. त्या फलकावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही, त्यामुळे त्या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे
खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये दाखल झाले असून गोवर्धनवाडीत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिंदेसेनेत जायचं की ठाकरेसेनेतच राहायचं, याचा निर्णय ओमराजे निंबाळकर जाहीर करणार आहेत.
शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. दोघांमध्ये २० मिनिटे बोलणं झालं. फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
फादर्स डेच्या निमित्ताने जय पवार यांनी अजित पवारांसाठी केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. वडिलांबद्दलचा आदर, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या या पोस्टमधील शब्दांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यासाठी सरकारने चहा पानासाठी आमंत्रण दिलं मात्र, आम्ही त्यांचा चहा पिऊ शकत नाही असं म्हणत विरोधकांनी बहिष्कार टाकला. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी चहा पानाला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकारने राज्यातील जनतेला दिलेले शब्द पाळले नाहीत अशी टीका जाधव यांनी केली.
ठाकरेसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची बंडखोरीनंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय... विकासकामं करायची असतील तर सत्तेत जाणं गरजेचं आहे... कामं होत नसल्यानं अनेकांनी पक्ष सोडलाय अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांची बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सहा मतदारसंघात जाऊन ते पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यांची लेक राजुल पाटील या पक्षाच्या मुंबईतील नगरसेविका आहे. यापार्श्वभूमीवर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण ठाकरेंसोबतच असल्याचे राजुल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात असल्याचे स्पष्ट करत माकपच्या नेत्यांनी संबंधित खासदारांविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईतील जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
"अमित शाह शिवसेना प्रमुखांचा आणि शिवसेनेचा अपमान करत आहेत. शिंदेंना उल्लेख करणं म्हणजे त्यांनी हा मराठी माणसाचा अपमान केला आहे. एकनाथ शिंदे ही अमित शाह यांची टेस्टट्यूब बेबी आहे. या बेबीला 4 वर्ष झाली आहेत. शाह सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. त्यांच्या दबावामुळेच पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने शिंदेना दिलं आहे. अमित शाहांच्या पोटातलं विष ओठावर आलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी अमित शहांच्या कालच्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला आहे.
ओमराजे ज्यांच्या उपयोगी पडलाय तो माणूस घरातल्या व्यक्तीचा उद्धार करेल असं वाटलं नव्हतं पण ते करण्यात आलं, ते मी सहन केलं. माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय. माझ्या नुसत्या चर्चेनं मी तीन दिवसात वाईट होत असेल तर खरंच वाईट आहे, अशी प्रतिक्रिया ओम राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून होणारे सततचे हल्ले आणि आणि शांतता करारातील अटींचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप करत इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली आहे.
ओमराजे निंबाळकर आज धाराशिवला जाणार आहेत. यावेळी खबरदारीचा भाग म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
पुणे-बेंगलोर हायवेवर कोल्हापूरहून जेजुरीला जाणारी एक मिनी बस आणि एका ट्रकची धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. त
बंडखोर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या तक्रारीनंतर, पक्षाच्या तीन बँक खात्यांमधून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे, यामध्ये अंदाजे 440 कोटी रुपये आहेत. या कारवाईमुळे निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या टीएमसीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बंडखोर पक्षाच्या आमदारांनी निधीच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सातारा सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 153 केंद्रावर मतदान होणार आहे. सहकार व संस्थापक पॅनेल मध्ये दुरंगी लढत होता आहे. कारखान्याचे 50 हजार च्या वर शेतकरी सभासद आहेत. या निवडणुकीसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले. संप यशस्वी करण्यासाठी काही आंदोलकांनी रस्त्यावर धावणाऱ्या बसला लक्ष्य केले. त्यानंतर धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलिस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. काही ठिकाणी बसच्या टायरमधील हवा काढण्याचे प्रकार घडले. तर, काही ठिकाणी दगडफेक करून बसच्या काचा फोडण्यात आल्या.
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे सुरू होणार असून, यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून माननीय पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान भवन ई-प्रवेश प्रणालीद्वारे "चेहरा पडताळणी पध्दती" अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली.
नांदेड शहरातील वाघीरोड परीसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 35 वर्षीय शेख शमीम आपल्या काही मित्रासोबत एका दुकानासमोर बोलत बसला होता. तेव्हा दुचाकीवरुन आलेल्या चारी ते पाच अज्ञात तरुणांनी पत्ता विचारला. शेख शमीम त्यांना पत्ता सांगत्त असताना त्या युवकांनी तलवार आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी गोळीबार केल्याची देखील माहिती आहे. या हल्ल्यात शेख शमीम यांचा मृत्यू झाला. खूनाचा कारण समजू शकले नाही , पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
दाढी फक्त वाघाला असते, आणि मला गर्व आहे कि माझा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे. जैन आणि सनातन धर्मासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. तुमच्या मनगटात जर दम असेल तर तुम्ही जा मुंब्रा, कल्याण, भिवंडीमध्ये. मात्र, तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. मी सनातनी आहे आणि सनातनसाठीच लढणार. माझ्या समाजासाठी माझी आहुती गेली तरी मी माझ्या समाजासाठी लढत राहणार, असं म्हणत जैन मुनी निलेशचंद्रन यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
ऐन मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 30 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा सरासरी 99 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होत असून सध्या विविध प्रकल्पांमध्ये एकूण केवळ 93 दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी तब्बल 202 प्रकल्पांनी तळ गाठला असून केवळ 24 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने शेतीसाठीचा पाणीउपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्सूनबाबात दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. 23 जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी देखील मान्सूनबाबत महत्वाची माहिती देताना, 22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रा लगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता सांगितली. हवामानाच्या मॉडेल्सनुसार, आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जूनच्या अखरपर्यंत राहू शकतो, असे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.