Ajit Pawar News : ''...हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही!''; अजित पवारांनी शिंदे - फडणवीस सरकारचे कान टोचले

Maharashtra Politics : नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही...
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama

Maharashtra Assembly Session : देशासह जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. पण एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रिमंडळात एकही महिला नाही. हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहे.

अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे थोडसं कमीपणाचं वाटत आहे. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नाही. मी अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांद्वारे या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar News
Ahmednagar : नगर जिल्हा बँकेत अजित पवारांना विखे पाटलांचा धक्का; नाट्यमय घडामोडीनंतर शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी

होळीचे रंग खेळा, पण...

अजित पवार म्हणाले, हवामान विभागाने ६ तारखेपासून ते ९ तारखेपर्यंत हवामान बदलले जाईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे हरभरा , मका , भाजीपाला, पिकाचे द्राक्षे कांदा या अनेक पिकांचे नुकसान झाले. लोकांनी मला त्याबद्दल निवेदने दिली आहेत. सरकार काही मदत करते का आम्ही मागणी करणार आहोत.

पवार म्हणाले, बरेच मान्यवर नेते, होळी, धुळवड असल्याने रंग लावण्याच्या आनंदात सहभागी झाले होते. होळी-धुळवड हे सण साजरे झाले पाहिजेत, आनंदात सहभागी झालं पाहिजे. पण महाराष्ट्रातला बळीराजा चिंतातूर झाला आहे. खचून गेला आहे, त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे अशी मागणीही यावेळी पवार यांनी केली.

Ajit Pawar News
Maharashtra Budget 2023 : जयंत पाटलांनंतर अजितदादांचाही फडणवीसांना चिमटा; म्हणाले,'' त्यांना राग येत नाही,ते...''

अजित पवार यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीवर भाष्य करताना म्हणाले, पाथर्डी आणि नगर दौऱ्यावर असताना तिथे काही लोकांनी मला निवेदनं दिली. मी स्वतःही सगळी स्थिती पाहत होतो. सगळं पिकं पडली आहे आणि शेतकरी हवालदिल होऊन चेहऱ्यावर मारून घेतो आहे. हे खूप हृदय पिळवटून टाकणारं चित्र आहे. सरकारला किती नुकसान झालं आहे याचा अंदाज आलेला नाही अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com