२० सेकंदांमध्ये अजितदादांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील टीका आटोपली

Ajit Pawar | Chandrkant Patil : चंद्रकांत पाटील या मोठ्या माणसावर छोट्या अजित पवारानं बोलणं अयोग्य
Chandrakant Patil - Ajit Pawar
Chandrakant Patil - Ajit Pawarsarkarnama

पुणे : "चंद्रकांत पाटील म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे की त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल एका छोट्या अजित पवारने टीका करणे, त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. मोठ्या माणसांच्या बद्दल मोठ्या माणसांना बोलल पाहिजे, मी अतिशय छोटा आहे", अशी खोचक टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अवघ्या २० सेकंदाचे उत्तर दिले. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनादिवशी ते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (PDCC) निवडणुकीत प्रदीप कंद (Pradip Kand) मोठ्या मतधिक्क्याने विजयी झाली आहेत. मात्र या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाली असून हा विजय म्हणजे फक्त सुरुवात आहे, आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ नक्की होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी व्यक्त प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला होता.

Chandrakant Patil - Ajit Pawar
बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाला गालबोट; धनंजय मुंडेंसमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

चंद्रकांत पाटील म्हणाले, "नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसला दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून २०१९ मध्ये बारामतीमधून सुरुवात केली. ती जागा अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते. विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेले. पण ५ वर्षात भाजपने अतिशय नम्रपणे काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोनवेळा शंभरपेक्षा जास्त जागांवर भाजपला विजय मिळाला.

Chandrakant Patil - Ajit Pawar
'नाराज कार्यकर्त्यांना कसे खुश करायचे हे मला चांगल्याप्रकारे माहिती आहे'

ते पुढे म्हणाले की, "कोविडनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रुपाने आपल्याला संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण पॅनल उभे केल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला होता. प्रदीप कंद यांची विरोधकांना जास्तच भिती वाटत होती. पण निकालानंतर प्रदीप कंद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत दमदार प्रवेश झाला. त्यानंतरही संचालकपदाच्या निवडणुकीत कंद यांना ज्या पद्धतीने विजय मिळाला, त्यामुळे विरोधकांना धक्काच बसला. तेव्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ होणार आहे. अनेक निवडणुका होणार असून, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com