Ajit Pawar News : शिंदे गटानंतर आता अजितदादांच्या 'या' मंत्र्यांची पालकमंत्रिपदातून मुक्त करण्याची विनवणी

Loksabha Election Result : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि चंद्रपूरकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण तिथून पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत.
Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
Dharmaraobaba Atram and Ajit PawarSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सर्वच पक्षाकडून पराभवाचे मूल्यमापन केले जात आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले असतानाच आता दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त करण्याची मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती.

त्यानंतर शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पालकमंत्री पदाचा भार हलका करण्यास संगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्रिपदावरून मुक्त करण्याची मागणी केली आहे. (Ajit Pawar News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पदमुक्त करण्याची मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. त्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला असून फडणवीस यांनीच जबाबदारी सांभाळावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही.

त्यामुळे साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची घोषणा शंभुराज देसाई यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केली होती.

Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
Manoj Jarange : आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच बच्चू कडूंचं मोठं विधान,...म्हणून जरांगे अन् भुजबळांनी एकत्र यावं!

त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी केली असल्याचे समजते. धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव, अधिक जबाबदारी नको अशी भूमिका घेत त्यांनी पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि चंद्रपूरकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण तिथून पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे आत्रामांनी पालकमंत्री पदापासून दूर राहण्याची तयारी केली असल्याचे समजते.

Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
Sandipan Bhumre : शिंदेंचे खासदार संदिपान भुमरे 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरेंचे मानले आभार

लवकरच नव्या पालकमंत्र्यांच्या घोषणेची शक्यता

गोंदियाचे पालकमंत्री पद सोडण्याची तयारी धर्मरावबाबा आत्राम (Dharmraobaba Atram) यांनी दर्शवल्यानंतर गोंदियासाठी लवकरच नव्या पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारावेळीच पालकमंत्रिपदही नव्या मंत्र्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पावसाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dharmaraobaba Atram and Ajit Pawar
Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar : 'मी अजितदादा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत! छगन भुजबळांनी बॉम्बच टाकला

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com