Ajit Pawar : अजितदादांनी शेवटची सही 'या' फाइलवर; आमदारांना मिळणार ताकद!

Ajit Pawar Last Signed File : अजित पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना समान निधीचे वाटप करत राज्यातील सर्व आमदारांना शेवटची भेट देऊन गेले.
Ajit Pawar Passed Away
Ajit Pawar Passed AwaySarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राज्यातील आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटी निधीपैकी तीन कोटी असे एक हजार ३५४ कोटींचा निधी वित्त विभागाने आज मंजूर केला आहे. विशेष म्हणजे आमदारांचा हा निधी एक कोटीवरुन पाच कोटीपर्यंत करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनीच हा निधी वितरणाच्या फाइलवर शेवटची स्वाक्षरीकेली आहे.

आमदारांना भरघोस विकास निधी देण्याचा आग्रह धरणाऱ्या अजित पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना समान निधीचे वाटप करत राज्यातील सर्व आमदारांना शेवटची भेट देऊन गेले.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २६७ विधानसभा सदस्य आणि ५४ विधान परिषद सदस्यांना या निधीचे वितरण करण्यात आले आहे. मात्र अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या अशा २४ आमदारांचा यामध्ये समावेश नाही.

आमदार निधीच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी अजित पवारांनी खासदारनिधीसाठी असलेल्या 'ई साक्षी' प्रणालीच्या धर्तीवर 'ई समर्थ' प्रणालीचा आग्रह धरला होता. पुण्यामध्ये याचा पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. पुण्यातील आमदारांचा विकास निधी या प्रणालीद्वारे वितरीत होणार आहे. या प्रणालीमुळे पुण्यातील आमदार विकास निधीच्या कामांची देयके थेट कंत्राटदारांच्या खात्यातु जमा केली जाणार आहेत.

Ajit Pawar Passed Away
Sharad Pawar News: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचे महत्वाचे विधान! अजितदादांप्रमाणे आमचीही इच्छा..., 12 तारखेला निर्णय....

अशा आहेत तरतुदी

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ आर्थिक वर्षाकरिता २२०० कोटींची तरतूद ६६० कोटींचा निधी 'बिम्स' करण्यात आली होती. या निधीपैकी प्रणालीच्या माध्यमातून आधीच वितरित झाला. त्यापैकी २५०.६२ कोटी इतका निधी वित्त विभागाकडून असा एकूण ९४४.६२ कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करुन दिले. त्यानुसार 'वीम्स' प्रणालीवर यापूर्वीचा शिल्लक ४०९.३८ कोटी व वित्त विभागाकडून प्राप्त९४४.६२ कोटी असा एकूण १३५४ कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

Ajit Pawar Passed Away
Eknath Shinde Politics : फायटर एकनाथ शिंदे! भाजपच्या आव्हानानंतरही ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महापौर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com