

Ajit Pawar Memorial Update: अजित पवार यांच्या आठवणी कायमस्वरुपी जपण्यासाठी बारामती येथे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेने घेतला आहे. याबाबत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हे स्मारक कुठे व्हावे, यासाठी जागेची पाहणी केली होती.
आज त्यांना या स्मारकाबाबत विचारले असता त्यांनी 'मला अजित पवार यांच्या स्मारकाबाबत मला माहीत नाही,' असे सांगितले. बारामतीमध्ये शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. संस्था याबाबत निर्णय घेणार आहे, असे ते म्हणाले.
पवार म्हणाले, "काही लोकांनी ज्या संस्थेच्या जागेची चर्चा केली आहे, त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. तरीही माझ्याशी कुणीही याबाबत बोलले नाही. त्यामुळे आता या विषयावर भाष्य करणे अयोग्य ठरेल." पक्षात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले. "याबाबत बैठक घेऊन नंतरच काय ते ठरवू. आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पवार म्हणाले.
अजितदादांनी विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले. दिवस-रात्र एक करून ते वाढवले. पण त्याच मैदानावर अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर शरद पवार यांनी त्यावेळी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी संवाद साधला. अजितदादांच्या स्मारकाबाबत चर्चा केली.
"दादांचे स्मारक उभ कारावं लागतयं हेच न पटणारं असल्याचे पवार म्हणाले होते. अजितदादांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना शरद पवार खूप भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि शब्द ही फुटत नव्हते.
अजितदादांच्या जाण्याने बारामतीत मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे स्मारक जय विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात झाले तर हे स्मारक बारामतीकरांना सदैव त्यांच्या योगदानाची आठवण करून देत राहील, अशी बारामतीकरांची इच्छा आहे.
अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर चर्चा दोन्ही पक्षात रंगली आहे. याबाबत दोन्ही पक्षातील काही आमदारांमध्ये एकमत होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर शरद पवारांना पत्रकार परिषदेत सवाल करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेल्या विधानावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
"फडणवीस विलीनीकरणाच्या चर्चेत नव्हते तर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?" असा थेट सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. "विलीनीकरणाची चर्चा अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये झाली होती," असंही शरद पवारांनी सांगितलं.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीकरणाची चर्चा सुरू होती. अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चेला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. दरम्यान, यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विलीकरणाची चर्चा सुरू असती तर अजितदादा मला बोलले असते. मात्र, त्यानी या संदर्भात ते काहीच बोलले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.