Ajit Pawar's Prediction: सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज, म्हणाले...

Ajit Pawar On Supreme Court : सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजित पवारांचं भाष्य; म्हणाले, निकाल काहीही लागला तरी...
Ajit Pawar News : Ajit Pawar On Supreme Court :
Ajit Pawar News : Ajit Pawar On Supreme Court :Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षाचा अभूतपूर्व निकाल उद्या (दि.११ मे) रोजी जाहीर होणार आहे. न्यायालयामध्ये गुरुवारी सकाळी अकरा वाजता निकालाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करणार आहेत. निकालाचे वाचन ज्यावेळी होईल तेव्हा त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. दरम्यान निकालाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही शक्यता व्यक्त केली आहे.

अजित पवार आज लातूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. अजित पवार म्हणाले, "शिवसेनेतलं बंड जून महिन्यात घडलं. सुप्रीम कोर्टाचं जे पाच जणांचं घटनापीठ होतं, ते मे महिन्यापर्यंत याचा निकाल लावतील असं अंदाज व्यक्त केला जात होता. आता उद्या निकाल लागणार आहे. मात्र निकाल काहीही लागला तरी, माझं स्वतं:चं मत आहे की, शेवटी सुप्रीम कोर्ट हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र कदाचित याबाबतचा निर्णय ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं मला वाटतं."

Ajit Pawar News : Ajit Pawar On Supreme Court :
Maharashtra Political Crisis: २० जून ते १० मेपर्यंत सत्तासंघर्षात काय-काय घडले; जाणून घ्या एका क्लिकवर

अजित पवार पुढे म्हणाले, "मी काही मोठ्या वकीलांशी चर्चा केली, त्यानुसार त्याचं म्हणणं आलं की, ही विधीमंडळातली बाब आहे. विधानसभा अध्यक्षांकडेच त्यांनी ही सर्व माहिती द्यावी, निकाल द्यावा, असा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही."

Ajit Pawar News : Ajit Pawar On Supreme Court :
Karnataka Election : कर्नाटकामध्ये 68 टक्के मतदान, घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर?

"आजच्या घडीला १४५ बहुमताचा आकडा सरकारकडे आहे. त्याप्रमाणे ते सरकार चालवतात. खूप जणांनी वक्तव्य केलेले, बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार. जरी म्हणायला तसं असलं, तरी अर्थसंकल्प त्यांनी सादर केलाय. सरकार ते चालवत आहेत, निर्णय ते घेत आहेत. बहुमतातल्या सरकारने जे निर्णय घ्यायचे असतात, ते घेत आहेत हे आपण अकरा महिने पाहतोय. १४५ किंवा त्यापेक्षा जास्तीचा आकडा सरकारकडे आहे, तोपर्यंत त्यांना काही धोका आहे, असं म्हणण्यात काही अर्थ नाही," असे अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com