Ajit Pawar vs Murlidhar Mohol : शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकमताने निवड झाली असून, ते चौथ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, कार्यकारिणीतील इतर सदस्यांची निवड झाली असून, काही नावांवर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नव्या कार्यकारिणीतील उर्वरित सदस्यांच्या नावांची घोषणा उद्या (ता. ३) करण्यात येईल, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुंबईत रविवारी सायंकाळी संपलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणी निवडीचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले. सचिवपदावर एकमत न झाल्याने कार्यकारिणी जाहीर न करण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये असून, त्यांच्याशी चर्चा करून अंतिम कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी आधी मुरलीधर मोहोळ यांनीही अर्ज दाखल केला होता. पण खेळात राजकारण नको, असा विचार करून आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
या विशेष बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एन. सरदेसाई उपस्थित होते. कार्यकारिणीमधील सचिव, सहसचिव आणि चार उपाध्यक्षांसह उर्वरित सदस्यांची नावे उद्या जाहीर करण्यात येतील, असे अजित पवार यांनी सांगितले. या निवडीनंतर पहिल्यांदा मुरलीधर मोहोळ यांच्या रुपाने अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिंक संघटनेत भाजपची धडाक्यात एन्ट्री झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.