पुणे : राज्य सरकारने नुकतेच सुपर मार्केट अर्थात किराणा मालाच्या दुकानात वाईनच्या विक्रीला परवानगी दिली आहे. वाईन निर्मितीला चालना आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सरकारने हा निर्णय घेत असल्याते सांगितले आहे. मात्र या निर्णयावर भाजपकडून आणि इतर व्यक्ती, संघटनांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.
मात्र या सगळ्या टीकांवर जाणिवपूर्वक गैरसमज पसरवला जात असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ते आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, दारु आणि वाईनमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे, तो फरक ओळखला पाहिजे. त्याबाबत उगाच गैरसमज केला जात आहे. आपल्या देशातील शेतकरी वेगवेगळी फळं घेतात. त्यापासून वाईन तयार होते. मात्र आपल्या इथे वाईन सेवनाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. जेवढी वाईन तयार महाराष्ट्रात तयार होते ती सगळी राज्यातच खपत नाही. कदाचित ती आजूबाजूच्या राज्यात जाते, तसेच परदेशातही निर्णात होते. पण काहींनी जाणिवपूर्वक मद्यराष्ट्र वगैरे असे म्हणत या निर्णयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार म्हणाले, आम्ही पण सरकारमध्ये काम करताना जनतेचे नुकसान होईल असे कोणतेही काम करणार नाही. मध्यप्रदेशने तर घरपोच मद्याचे निर्णय घेतले आहे. आपण तसे काही करत नाही. आपण केवळ वाईनला काही नियम आणि अटींसहित सुपर मार्केटमध्ये परवानगी देत आहोत. मात्र काही लोक व्हिडीओ काढून सरकारच्या विरोधात प्रचार करत आहेत, जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत त्याबाबतची नियमावली तयार झाल्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मास्क बंधनकारक!
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून मास्क हटणार असल्याच्या चर्चा दिसून आल्या. त्याबाबतच्या बातम्या देखील काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील याबाबतची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या सर्व बातम्या आणि चर्चा धादांत खोट्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत देखील अशी कोणतीही चर्चा झालेली नसून महाराष्ट्रात अद्याप मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.