Prakash Ambedkar : अकोल्यात आज ठरणार वंचित विरोधात महाविकास की, महायुती ?

Akola Lok Sabha Election 2024 : महाविकास व इंडिया आघाडीसोबत युती न करता स्वतंत्र लढणारे वंचित नेते प्रकाश आंबेडकर, महाविकास व काँग्रेसचे उमेदवार डाॅ.अभय पाटील आणि महायुती व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यात थेट लढत अकोला लोकसभा मतदारसंघात होत आहे.
Prakash Ambedkar : अकोल्यात आज ठरणार वंचित विरोधात महाविकास की, महायुती ?
Abhay Patil, Anup Dhotre, Prakash Ambedkar

Akola Lok Sabha Election 2024 Voting LIVE : अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम,अकोला पूर्व, मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघासह वाशीम जिल्ह्यातील रिसोड या मतदारसंघाचा समावेश आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 3 लाख 40 हजार मतदाता हे अकोला पूर्व लोकसभा विधानसभा मतदारसंघात येतात. अकोला लोकसभा मतदार संघात एकूण 18 लाख 90 हजार मतदार आहे. 9 लाख 77 हजार पुरुष आणि 9 लाख 13 हजार स्त्री मतदार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पाडण्यासाठी सुमारे साडेअकरा हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडी व काँग्रेस उमेदवार डाॅ. अभय पाटील, महायुती व भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. असे एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहे. अकोला पूर्व आ.रणधीर सावरकर, मूर्तिजापूर हरिश पिंपळे, अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे, तर अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar : अकोल्यात आज ठरणार वंचित विरोधात महाविकास की, महायुती ?
Muslim Reservation : कर्नाटकात मुस्लिम आरक्षण, मोदींचे 'ते' वक्तव्य आणि वस्तुस्थिती

लोकसभा मतदारसंघातील बाळापूर विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख प्रतिनिधित्व करतात. तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक प्रतिनिधित्व करतात. जिल्ह्यात अमरावती पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे धीरज लिंगाडे हे आमदार असून, विधान परिषदेत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी अकोल्याचे रहिवासी आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल हे प्रतिनिधित्व करतात. या लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे, तर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ताब्यात अकोला जिल्हा परिषद आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या अकोट विधानसभा मतदारसंघ भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विधानसभा मतदारसंघात दू. 1 वा. मतदानाची एकूण 31.52 टक्केवारी ही इतकी झाली आहे. या मतदारसंघात अकोट ते अकोला हा मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांची नाराजी आहे. तर अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ परिसरात जो शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे आमदार नितीन देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. दुपारी 1 वा. एकूण मतदान 33.11 टक्के झाले आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपकडे होता. येथील आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ रिक्त आहे. येथे पोटनिवडणुक घोषित झाली होती. पण, उच्च न्यायालयाने ती रद्द केली. या विधानसभा मतदारसंघात आज दु.1 वाजेपर्यंत 28.50 टक्के मतदान झाले. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजप सरचिटणीस रणधीर सावरकर करतात. या मतदारसंघात लोकसभेचे सर्वाधिक मतदार आहे. या मतदारसंघात दु.1 वाजेपर्यंत 34.10 टक्के मतदान झाले. जे सर्वाधिक आहे.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजप आमदार हरिश पिंपळे करतात. या मतदारसंघात दू.1 वाजेपर्यंत 33.47 टक्के मतदान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे. इथे चुरशीची लढत वंचित आणि काँग्रेसमध्ये होण्याची चिन्हं आहेत. या मतदार संघातून काँग्रेसचे आमदार अमित झनक हे प्रतिनिधित्व करतात. या रिसोड विधानसभा मतदारसंघात दु.1 वाजेपर्यंत 32.92 टक्के मतदान झाले.

अकोला लोकसभा मतदारसंघ (Akola Lok Sabha Election 2024 Voting)

अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 32.25 मतदान झाले. अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील तर भाजप युवा नेता अनुप धोत्रे यांच्यात थेट लढत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18,90,814 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. या मतदारसंघात 2014 मध्ये 16,72,643 मतदार होते. 2019 मध्ये एकूण मतदार हे 18,65,169 होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 18,90,814 इतकी झाली आहे. अकोला मतदारसंघात 2014 मध्ये 58 टक्के व 2019 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही इतकीच राहिली तर मतदार मात्र कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. यंदा अकोल्याकडे संपूर्ण राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही महत्त्वाची ठरणार आहे.

R

Prakash Ambedkar : अकोल्यात आज ठरणार वंचित विरोधात महाविकास की, महायुती ?
Solapur Lok Sabha 2024 : मोदी-ठाकरे-पवारांची सोलापूरमध्ये एकाच दिवशी होणार सभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com