Akola Politics : महाविकास मध्ये ठिणगी ; अकोला पश्चिम पोटनिवडणुकीत काँग्रेस - शिवसेना आमने सामने !

Congess Vs Shiv Sena : लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात अकोला पश्चिम विधानसभा निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार आज जाहिर केला. पण, तत्पुर्वी शिवसेना उमेदवाराला उध्दव ठाकरे यांनी आशिर्वाद दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Akola Lok Sabha Constiuency
Akola Lok Sabha ConstiuencySarkarnama
Published on
Updated on

Akola West Bye Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबर अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत अद्याप भाजप चा उमेदवार जाहिर झाला नाही. काँग्रेस ने येथे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अकोला विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्याने अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस च्या वतीने डाॅ.अभय पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. ही घोषणा शनिवार, रविवार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस ला विधानसभा पोटनिवडणुक व लोकसभा निवडणुक यात बॅलन्स करावे लागु शकते. काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी नतिकोद्दीन खतीब यांच्या नावाचा विचार करत होती. पण, लोकसभेचे हे तिकिट खतीब यांना की डाॅ.अभय पाटील यांना मिळते हे येत्या दोन दिवसात निश्चित होईल.

गेल्या निवडणुकीत साजीद खान पठाण हे केवळ 2,593 मतांनी पराभुत झाले होते. त्यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांना 73,262 (43.23 टक्के) मते मिळाली होती. तर साजिद खान पठाण यांना 70,669 (41.7 टक्के) मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित उमेदवाराला 20,687 मते मिळाली होती. या 2019 च्या निवडणुकीत साजीद खान पठाण यांचा अगदी कमी मतांनी पराभव झाला होता. महाविकास आघाडीत मात्र साजीद खान पठाण यांच्या उमेदवारीवरुन नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीत या विषयी मान्यता न घेता ही उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच बरोबर काँग्रेसमध्ये देखील साजीद खान यांच्या उमेदवारी वरुन आरोप प्रत्यारोप होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola Lok Sabha Constiuency
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, ‘वसंतदादां’ना अभिवादन अन् चंद्रहार पाटलांची उमेदवारी...

महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांना तयारी करण्याचा आदेश दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी राजेश मिश्रा यांना शिवसेनेची अकोला पश्चिम ची उमेदवारी दिल्याचा दावा खुद्द राजेश मिश्रा यांनी आज केला. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी नसेल काय, असा प्रश्न या निमित्त समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अकोला लोकसभा मतदार संघात वंचितला सोडण्याचा विचार काँग्रेस ने गुंडाळल्याची माहिती समोर येत असुन वंचित स्वतंत्रपणे लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुक लढणार आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुक लढण्याची शक्यता वाढली आहे.

अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अद्याप भाजप ने उमेदवार निश्चित केला नाही. या ठिकाणी सहा वेळा आमदार असलेल्या गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणुक घोषित झाली आहे. या ठिकाणी भाजप इच्छूकांमध्ये माजी महापौर विजय अग्रवाल, हरिश आलिमचंदानी, मोतीसिंह मोहता, डाॅ.अशोक ओळंबे, गिरिश जोशी आणि गोवर्धन शर्मा यांचे चिरंजीव कृष्णा शर्मा यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. नव्या राजकीय परिस्थितीत भाजप कोणाला तिकिट येथे घोषित करते हे पाहण्यासारखे असेल.

Akola Lok Sabha Constiuency
Arvind kejriwal Arrest By ED : दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com