Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी स्पष्टचं सांगितले 'आता डिपाॅझिट जप्त करू....'

Navneet Rana : अमरावतीबाबत फोन नाही, चर्चा नाही, बैठक नाही कुठलाही विषय नाही असे म्हणत बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार प्रहार करण्याची तयारी सुरू केली आहे. 'किसमे कितना दम है देख लेते' असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवरदेखील तोंडसुख घेतले.
Bacchu Kadu | Navneet Rana
Bacchu Kadu | Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Amravati Loksabha Election 2024 : भाजपअंतर्गत विरोध डावलून त्याचबरोबर राज्यातील महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता अमरावती येथे भाजपने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी आता डोकेदुखी ठरत आहे. नवनीत राणा यांचे डिपाॅझिट जप्त करण्याची तयारी प्रहारची असल्याची घोषणाच प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी केली.

अमरावतीविषयी महायुती चर्चा होणार नाही. महाराष्ट्रातील इतर जागांबाबत आम्ही चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडे अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ आहे, तर प्रहारने शिवसैनिक दिनेश बूब यांना उमेदवारी देत या ठिकाणी तिरंगी लढत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bacchu Kadu | Navneet Rana
Akola Loksabha : काँग्रेसने वंचितला दाखविला आरसा, महाराष्ट्रात भाजप नेते मात्र सुखावले !

महायुतीचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय निर्णय घेतात हे पाहू, असे म्हणत बच्चू कडू यांनी त्यांचे स्पष्ट संकेत महायुतीच्या नेत्यांना दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच चलबिचल आहे.

इतकेच नाही तर नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे नेते संजय खोडके यांनीदेखील नवनीत राणा यांना इशारा देत विरोधाची भूमिका घेतली आहे. वंचितनेदेखील अमरावती मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. प्रहारचा भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधातील संघर्ष वाढत आहे. तो टोकाला जात आहे.

अमरावती लोकसभा निवडणूकविषयी प्रहारचा निर्णय अंतिम आहे. असे सांगत बच्चू कडू यांनी थेट लढण्याचे संकेत दिले आहे. या ठिकाणी दिनेश बूब या शिवसैनिकाला उमेदवारी देत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आधीच या मतदारसंघात रंगत आणली आहे. त्यात भाजप अंतर्गत नवनीत राणा या आयात उमेदवाराबद्दल तीव्र नापसंती आहे. अशा परिस्थितीत नवनीत राणा यांच्यासमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय करायचे याबाबत प्रहार नेते बच्चू कडू यांनी चर्चा होऊ शकते, अशी भूमिका आज पत्रकारांशी बोलताना घोषित केली. पण, अमरावतीबाबत मागे वळून पाहणार नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

अमरावतीबाबत फोन नाही, चर्चा नाही, बैठक नाही कुठलाही विषय नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार प्रहार करण्याची तयारी सुरू केली आहे. 'किसमे कितना दम है देख लेते' असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवरदेखील तोंडसुख घेतले.

नवनीत राणा भाजपमध्ये (BJP) आहे तर रवी राणा कुठे आहे, असा उपरोधिक प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला. भाजप युवा स्वाभिमान होण्याची भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केली. इतक्या दूर तीर सुटला आहे आता तो मागे येणार नाही, निशाणा लागल्यावरच तो तीर मागे येईल. दोन लाखांच्या मतांनी पराभूत करू वेळप्रसंगी नवनीत राणा यांचे डिपाॅझिट जप्त करू, असा इशाराच बच्चू कडू यांनी आज दिला.

R

Bacchu Kadu | Navneet Rana
Navneet Rana News : भाजपच्या नवनीत राणांचं टेन्शन वाढलं, आचारसंहितेचा भंग? अजित पवार गटानेच दिला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com