SSC English Paper: काय सांगता! दहावी इंग्रजी पेपर गैरप्रकार; शिक्षण अधिकारीच निघाला मास्टरमाईंड

Amravati SSC English Paper Education Officer Mastermind: पेपर संपल्यानंतर त्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा करवून न घेता कर्मचारी अनिल हाडोळे यांच्यामार्फेत बाहेर पाठविण्यात आल्या, त्या बाहेरच लिहून पुन्हा गठ्ठयात टाकत असताना पथक आल्याने तो कट उधळला गेला.
SSC, HSC exams
SSC, HSC examsSarkarnama
Published on
Updated on

Amravati News: अमरावतीतील अंजनगाव सुर्जी येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर गैरप्रकारात आतापर्यंत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाचा तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

उत्तर पत्रिकांबाबत गंभीर अनियमितता करण्याच्या कटात थेट प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल अभ्यंकर हाच मास्टरमाईंड असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील डीसी 18 परीक्षा केंद्रावर दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परिक्षेदरम्यान उत्तर पत्रिकांबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाच परीक्षा केंद्राचे पर्यवेक्षक सुधीर खोडे याच्यासह उपपर्यवेक्षक आणि अन्य संबंधितांसह पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची दाखल झाला आहे.

सीताबाई संगई विद्यालयाच्या आवारातील पेपर कस्टडीतून दहावी इंग्रजी विषयाच्या दोन उत्तरपत्रिका चोरून त्या बाहेर दोन संबंधित विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आल्या होत्या.

पेपर संपल्यानंतर त्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा करवून न घेता कर्मचारी अनिल हाडोळे यांच्यामार्फेत बाहेर पाठविण्यात आल्या, त्या बाहेरच लिहून पुन्हा गठ्ठयात टाकत असताना परीक्षा बोर्डाचे भरारी पथक आल्याने तो कट उधळला गेला.

सुशिल अभ्यंकर याने त्या दोन परिक्षार्थी विद्यार्थांच्या उत्तरपत्रिका अनिल हाडोळेला दिल्या. हाडोळे याने विद्यार्थ्यांकडून लिहून परतही आणल्या होत्या, पण त्या परत गठ्ठ्यात जमा करताना भरारी पथकातील उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते त्याला दिसल्याने तो त्या उत्तरपत्रिका सब कस्टोडियन असलेल्या सुशील अभ्यंकर जवळ देऊ शकला नाही.

SSC, HSC exams
Bal Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव होता..! ATSच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट

उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांनी त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. त्यावेळी त्याने त्याच्याजवळील दोन उत्तरपत्रिका बाहेर काढून दिल्या.

हाडोळे, सुधीर खोडे याला काल (१ मार्च) पहाटे अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीनं पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळं दहावीच्या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com