Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वाॅरंट..

Arrest warrant issued against MNS President Raj Thackeray : निलंगा येथे तत्कालीन मनसे कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळाच्या गाडीची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

MNS Marathwada News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (ता.30) अजामीन पात्र अटक वाॅरंट जारी केले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर निलंगा येथे झालेल्या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव आरोपी म्हणून आठव्या क्रमांकावर होते.

यापुर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना या प्रकरणात निलंगा न्यायालयात हजर राहावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी झाल्याने त्यांना पुन्हा निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. 2008 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

निलंगा येथे तत्कालीन मनसे कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळाच्या गाडीची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2008 मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवरती (फाटा) महामंडळाच्या बसची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता.

Raj Thackeray News
Raj Thackeray News : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप, म्हणाले...

यापूर्वी निलंगा न्यायालयाने राज ठाकरे यांचा जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. (MNS) शिवाय त्यांच्या वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. शिवाय त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी केले आहे.

या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख व इतर तिघे काल शुक्रवारी (ता.30) रोजी न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्याविरोधात काढलेले वाॅरंट तामील झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता. पुन्हा न्यायालयाने दंड लावला व नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. रितसर वकिलामार्फत काल जामीन मिळाला आहे.

Raj Thackeray News
MNS Candidate : विधानसभा रणसंग्रामातील मनसेचे सात शिलेदार

मात्र राज ठाकरे व मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळूंके हजर राहत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पुन्हा अजामीन पात्र वाॅरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे व अभय सोळूंके यांना हजर करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com