समीर वानखेडेंना काऊन्सिलिंगच्यावेळी आर्यन म्हणाला..

मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांनीही आर्यन खानचं समुपदेशन केलं. ''आपल्याला समाजातील गरिबांसाठी काम करायचं आहे,'' असे आर्यन खान (Aryan Khan) म्हणाला.
Aryan Khan
Aryan KhanSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अभिनेता शाहरूख खान व डिझायनर गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अंमली पदार्थ विरोधी विभाग अर्थात एनसीबीने (ncb) अटक केलेली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अटक केलेली आहे. त्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे. एनसीबीच्या कोठडीत आर्यन खानचं असताना समुपदेशन अर्थात काऊन्सिलिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्याने आर्यनची काऊन्सिलिंग केलं आहे. आर्यन खानबरोबरच अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या आठही जणांची काऊन्सिलिंग करण्यात आली. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनीही आर्यन खानचं समुपदेशन केलं. ''आपल्याला समाजातील गरिबांसाठी काम करायचं आहे,'' असे आर्यन खान म्हणाला. ''भविष्यात चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुम्हाला अभिमान वाटेल, असं काम भविष्यात करेन,'' असं आर्यन समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना म्हणाला.

Aryan Khan
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; दत्ता भरणेंनी शब्द पाळला

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली असून, त्याच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आर्यनच्या जामीनावर २० ऑक्टोबर रोजी निकाल दिला जाणार आहे. ''बाहेर पडल्यानंतर एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेन,'' असं आर्यन खान या काऊन्सिलिंगवेळी म्हणाला.

क्रूझ ड्रग्स (Drugs party) पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा (Aryan Khan) तुरुंगातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयात गुरुवारी झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीनंतर विषेश न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी २० ऑक्टोबरपर्यंत हा निकाल राखून ठेवला आहे. एनसीबीने आर्यनला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते आणि चौकशीनंतर अटक केली होती. तो सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.

एनसीबीच्या दाव्यानुसार आर्यनने फक्त भारतातच नाही तर इंग्लंड, दुबई अशा बाहेरच्या देशांमध्ये देखील ड्रग्जचे सेवन केले आहे. तो नियमित आपला मित्र अरबाजसोबत ड्रग्स घेत आहे. ते दोघे मागच्या १५ वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com