Monsoon Session News : मुश्रीफांनी लाभार्थ्यांचा आकडा सांगताच खडसे म्हणाले, यातले बोगस किती ?

Eknath Khadse : सध्या राज्यात ४१ लाख लाभार्थी असून त्यांना आपण ७ हजार कोटी देतोय असे मुश्रीफांनी सांगितले.
Monsoon Session News
Monsoon Session NewsSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Parsad : वैयक्तिक लाभाच्या योजनाचांच्या लाभ घेणाऱ्या निराधार महिलांची बंद झालेली पेन्शन सुरू, ती पुर्वी प्रमाणे सुरू ठेवून उत्पानाची अट २५ हजारांवरून ५० हजार करा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. (Monsoon Session News) यावेळी लाभार्थ्यांची आकडेवारी आणि त्यावर राज्य सरकार करत असलेला खर्च याची माहिती मुश्रीफांनी सभागृहात ठेवली. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी या योजनांचे लाभार्थी जर ४१ लाख असतील तर ते अतिदरीद्री म्हणावे लागतील. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, यातील बोगस किती? असा सवाल करत मुश्रीफांना कोंडीत पकडले.

Monsoon Session News
Monsoon Session News : साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे परस्पर पुनर्गठण; संचालक मंडळ बरखास्त करा..

निराधार महिलांना सुरू असलेली पेन्शन २५ हजारांच्या उत्पादन मर्यादेच्या अटीमुळे बंद झाली. आता नव्याने ती सुरू करण्यासाठी त्यांना पुन्हा उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी फिरावे लागत आहे. (Monsoon Session) त्यामुळे पुर्वी ज्यांची पेन्शन सुरू होती, त्यांना कुठलीही कागदपत्रे न मागवता तशीच सुरू ठेवावी. उत्पनाची अट ५० हजारांची करावी. पंधराशे रुपये मिळवण्यासाठी लाभार्थ्याला शंभर रुपये खर्च करावे लागतात.

हे पैसे घरपोच देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच या लाभार्थ्यांचा समावेश अंत्योदमध्ये करणार का? असे प्रश्न सतेज पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थितीत केले होते. यावर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) उत्तर देतांना म्हणाले, ज्यांची पेन्शन बंद झाली आहे, ती मार्चनंतर सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. (Eknath Khadse) ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी जावून पैसे काढण्यासाठी येणारा खर्च पाहता, त्यांना घरपोच पैसे देण्यासंदर्भात देखील प्रयत्न करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.

२५ हजारांची उत्पन्न मर्यादा ५० करण्यावर देखील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करू, असे ते म्हणाले. सध्या राज्यात ४१ लाख लाभार्थी असून त्यांना आपण ७ हजार कोटी देतोय असे मुश्रीफांनी सांगितले. यावर ४१ लाख लोक जर लाभार्थी असतील तर ते अतिदरीद्री म्हणावे लागतील अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. या लाभार्थ्यांपैकी किती जणांकडे उत्पन्नाचे बोगस दाखले आहेत हे तपासा.

त्यापेक्षा मर्यादा वाढवा, केद्राने ६० वर्ष केले मग आपण करणार का? भूमिहीनांच्या यादीत एक हेक्टरवाल्यांची नावे घालून त्यांना अनुदान देणार का? असा प्रश्न देखील त्यांनी मंत्र्यांना केला. संजय गांधी, दिव्यांग योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी उत्पनाचा दाखल्याची मर्यादा ७५ हजारांची करावी, अशी मागणी या चर्चेत सहभाग घेत आमदार अमित वंजारी यांनी केली. पण ते शक्य नसल्याचे मुश्रीफांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com