Ashish Shelar Post : बांगलादेशात हिंसाचाराच चिघळत चालला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून सोडल्यानंतर आगडोंब उसळला आहे. हसीना यांनी देश सोडताना बांगलादेशात उद्रेक सुरू झालाय. बांगलादेशींनी तेथील हिंदूंना टार्गेट केला जातेय. त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी 'संकट दारात ! हस्तक आपल्या घरात ??'अशा आशयाची पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. बांगलादेशातील अस्थिरतेवर चिंता व्यक्त केली आहे.
हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. लुटमार आणि मंदिरांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इस्कॉन मंदिरात मूर्तीची तोडफोड करण्यात आली. मंदिराला आग लावण्यात आली आहे. "आपल्या देशाच्या दारा पर्यंत ही संकटे येऊन ठेपली आहेत." संकट आपल्या दारात आणि संकटाचे हस्तक आपल्या घरात?? सावधान !! सावधान !! अशी पोस्ट करत जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
'संकट दारात ! हस्तक आपल्या घरात ??'
जगातील काही देश युध्दच्या तयारीत आहेत. भलेभले देश आर्थिक खाईत आहेत. पाकिस्तान तर समस्यांंच्या वणव्यात केव्हाच जळून खाक झालाय. आता बांग्लादेश पेटला, अराजकता माजली.बांगलादेशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळीच घडी उध्वस्त झाली. तिथल्या हिंदूवर हल्ले केले जात आहेत. देशाची प्रतीके, हिंदू मंदिरे उध्वस्त केली जात आहेत.
आपल्या देशाच्या दारा पर्यंत ही संकटे येऊन ठेपली आहेत. या सगळ्यात काही शक्तींंचा मोठा वाटा आहे. आपल्या देशात गेली 10 वर्षे ज्या पध्दतीने वातावरण निर्माण केले जातेय, त्यावरून "त्याच आंतरराष्ट्रीय शक्तींनी" आपले हस्तक भारतात पण नियुक्त केले तर नाही ना? जे इथल्या यंत्रणा, न्यायालय, पोलीस, कायदा, प्रशासन आणि संसद सगळ्या लोकशाहीच्या स्तंभावर अविश्वास निर्माण करीत आहेत. ISIS, PFI, सीमी,लश्कर-ए-तैयबा ,जैश-ए-मोहम्मद ,हिज़बुल मुजाहिद्दीन, माओवादी अशा संघटनांची भाषा राजकीय व्यासपीठावरुन बोलत आहेत. समाजा-समाजात, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. टीव्ही, सोशल मिडिया यांचा वापर करुन अशांतता पसरवत आहेत. असा सवाल शेलार (ashish Shelar) यांनी व्यक्त केला आहे.
बांगलादेशात (Bangladesh) सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आरक्षणासह इतर मुद्यांवरून आंदोलनाला तीव्र हिंसक वळण लागलं आहे. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जाव लागलं खरं पण.. बांगलादेशातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बांगलादेशात आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ सुरु आहे. हल्लेखोर अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना टार्गेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे तिथल्या हिंदूबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.