Narendra Modi : कर्नाटकात दारू दुकानदारांकडून 700 कोटी गोळा केले; PM मोदींचा काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल

PM Narendra Modi speaking on Congress corruption allegation of collecting crores of rupees from liquor shopkeepers in Karnataka : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोले इथल्या सभेत काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोलतााना कर्नाटकमधील दारू दुकानदारांकडून वसुलीवर टीकास्त्र सोडले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे.

यात मोदी सर्वाधिक काँग्रेसला टार्गेट करू लागेत. भ्रष्टाचाराचा आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून तब्बल 700 कोटी रुपये वसूल केल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला (Congress) राजघराण्यातील एटीएम कोणाला संबोधले जाते? असा प्रश्न करत जिथे काँग्रेसचे सरकार बनते, ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते, असा घणाघात केला. "माचल, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये काँग्रेसच्या राजघराण्याची एटीएम बनली आहेत. महाराष्ट्रात निवडणुकांच्या नावाखाली कर्नाटकातील संकलन दुप्पट झाले आहे. महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि कर्नाटक आणि तेलंगणामध्ये संकलन दुप्पट झाले आहे. यातून या लोकांनी कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून 700 कोटी रुपये वसूल केले", असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Narendra Modi
Top 10 News : प्रचारासाठी अवघे 12 दिवस शिल्लक; मुस्लिम आरक्षणावरून अमित शाहांनी ठणकावले - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

"महायुतीच्या जाहीरनाम्यात महाआघाडीच्या (MVA) घोटाळ्याचे पत्रही आल्याचे सांगत, आता साऱ्या देशाला कळलंय-महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार! महाआघाडी म्हणजे हजारो कोटींचा घोटाळा! महाआघाडी म्हणजे पैशांची उधळपट्टी! महाआघाडी म्हणजे टोकन मनी! महाआघाडी म्हणजे बदली-पोस्टिंगचा धंदा", असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.

Narendra Modi
Aditya Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुरतहून उद्धव ठाकरेंना फोन..; आदित्य यांच्या फोडणींने ठसका उठणार

मराठी भाषाला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा सौभाग्य लाभल्याचे सांगून मोदी यांनी ही मागणी पूर्ण करण्याचा मान आपल्याला मिळाला, याचे सौभाग्य आपण मानतो. महायुती सरकारची पुढील पाच वर्षे कशी असतील, हे सांगताना महिलांची सुरक्षा आणि महिलांना संधी, माझी लाडकी बहीण योजनेचा विस्तार, तरुणांना लाखो नोकऱ्या, मोठी विकासकामे, महायुतीचे सरकार महाराष्ट्राचा विकास दुप्पट वेगाने पुढे नेणार आहे, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.

शेतीचे उत्पन्न वाढवणार

नरेंद्र मोदी यांनी संकल्प सांगताना शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की तो देशाच्या प्रगतीचा नायक म्हणून उदयास आला पाहिजे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि खर्च कमी करत आहोत. आम्ही पीएम किसान सन्मान निधी सुरू केला, महायुती सरकारने पाठिंबा दिला. परिणामी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळत आहेत, असे सांगितले.

काँग्रेसचे जातीच्या राजकारण

जातीभेद वाढवून काँग्रेसला एससी समाजातील विविध जातींना लढवायचे आहे. यातून जातीचे राजकारणावर काँग्रेस वर्चस्व निर्माण करून, सरकारमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होईल. याचा फायदा काँग्रेसला घ्यायचा आहे. यातून काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे डाव असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com