Mumbai News : शिवसेना पक्ष आणि संघटना फुटीनंतर लोकसभा निवडणूक झाली, आता विधानसभा निवडणुकीला खऱ्या अर्थाने दोन्ही शिवसेनेचा कस लागणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही बाजून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे.
यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'सुरत'विषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरतहून उद्धव ठाकरेंना फोन केला होता. ते त्यात रडले होते, असा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत दिली. यात मुलाखतीत त्यांनी शिवसेना पक्ष आणि संघटनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 2022 मध्ये केलेल्या बंडावर भाष्य केले. हे बंड 2021 मध्ये सुरू झाल्याचा दावा करताना बंडात सहभागी झालेल्या आमदारांवर देखील आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.
आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेनेतील (Shivsena) बंडाची सुरवात 2021 मध्ये झाली होती. उद्धव ठाकरे त्यावेळी खूप आजारी होती. दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तेव्हाच एकनाथ शिंदे यांच्या जवळच्यावर कारवाई सुरू झाली. ईडीने छापेमारी सुरू केली. त्यांना पण सांगण्यात आले की, तुम्ही सोबत आला नाही, तर तुम्हाला जेलमध्ये जावा लागेल". मुख्यमंत्री आजारी आहेत, इथंच त्यांनी डाव साधला आणि विरोधकांनी एक-एक आमदार विकत घेतला, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
"या सर्व गोष्टी काना येत असल्याचे आदित्य यांनी सांगून अशा परिस्थितीमध्ये काय करायचे हे आम्हाला देखील कळलं होते. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलवलं. तिथं दोघांमध्ये चर्चा झाली. बाहेर जे करत आहात, ते कानावर येत असल्याचे सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? जर व्हायचं असेल, तर व्हा, असे म्हणताच एकनाथ शिंदे रडायला लागले आणि म्हणाले की, जेलमध्ये जायचं हे माझं वय नाही आहे. मला जेलमध्ये नाही जायचं. म्हणून मी भाजपसोबत खोंट बोलत आहे की, मी तुमच्यासोबत येईल. तुमच्या कानी आलेले खरं नाही आहे. शिवसेना फुटीनंतर कळलं की, हे सर्व काही षडयंत्र आहे ते", असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
राज्यसभेच्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराला पाडण्यात आले. त्यानंतर माझ्यासोबत ते अयोध्येला आले. तेव्हात तेथून पळण्याचा त्यांचा प्लॅन होता. सगळं ठरलं होते, याची आम्हाला कल्पना होती. विधानपरिषदेत आमचे दोन उमेदवार जिंकले होते. मात्र एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन निघून गेले. अगोदर आम्हाला वाटले की, त्यांच्यासोबत 12 आमदार आङेत. पण दिवसेंदिवस हा आकडा वाढला. यात मोठे चेहरे समोर आले. ज्यांनी खूप खाल्लं होते, ते पळाले. यातील काहींनी सांगितले की, या गोष्टींमध्ये आम्ही फसणार आहोत. त्यामुळे हे पाऊल उचलंल, असा धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरेंनी केला.
एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतेही वाद नव्हते. जेव्हा शिंदे सुरतला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांनी फोन केला. तेव्हा देखील ते फोनवर रडले होते. ते म्हणत होते की, 'आता मागे फिरलो, तर हे लोक मला मारून टाकतील. मला संपवतील'. ते खूप वेळा रडले. मात्र हे झालं ते वाईट झाले. आपले मुख्यमंत्री आजारी आहेत, ते रुग्णालयातून बाहेर येतील की नाही माहीत नाही. आपलं भविष्य आपण घडवूया. स्वतः जेलमध्ये जायचे नाही, असे ठरवून एकनाथ शिंदे यांनी षडयंत्र रचून हे बंड केल्याचा धक्कादायक दावा आदित्य ठाकरेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.