Vijay Wadettiwar : भाजपने मध्य प्रदेशमध्ये 'लाडकी'चे पैसे दिले नाहीत; कर्नाटकमध्ये जावे अन् तोंड स्वच्छ करावं

Vijay Wadettiwar BJP mahayuti Congress MVA Maharashtra Karnataka Ladki Yojana Madhya Pradesh : काँग्रेसने कर्नाटकमध्ये लाडकी बहीण योजना बंद केल्याच्या महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या खोट्या जाहिरातीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भडकले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कर्नाटक आणि तेलंगणामधील लाडकी बहीण योजनेविषयी महाराष्ट्रात खोटी जाहिरातीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

"खोटं खोटं, किती खोटं, यांनीच (भाजप) मध्य प्रदेशमधील लाडकी बहीण योजनेचे गेल्या पाच महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. खोटी जाहिरात करणाऱ्या भाजपने आता कर्नाटकाचे आमंत्रण स्वीकारावे अन् तोंड स्वच्छ करून यावे", असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसाठी संवाद साधला कर्नाटकमध्ये लाडकी बहीण योजना बंदी झाल्याची जाहिरात महाराष्ट्रात भाजप महायुतीने केली. विजय वडेट्टीवार यांनी भाजप महायुतीच्या खोटारडे पणावर जोरदार निशाणा साधला. भाजप महायुतीला (Mahayuti) झुठों के सरदार म्हणत, महाराष्ट्राच्या गादीवर सगळे खोटारडे बसले आहेत, असा सणसणीत टोला दाखवला.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar NCP : शरद पवार अन् अजित पवारांचे कार्यकर्ते भिडले; 150 जणांवर गुन्हे दाखल

विजय वडेट्टीवार म्हणाले, "महायुती, झुठों की सरदारने भरले आहेत. महाराष्ट्राच्या गादीवर सगळे खोटारडे बसलेत. जे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडतात, चिन्हं पळवतात, बेईमानी करून सत्ता मिळवतात, खोट बोलतात, यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा आहे. कर्नाटकाला बदनाम करण्यापेक्षा तिथं जाऊन बघा".

Vijay Wadettiwar
Rohit Pawar: पहाटेच्या शपथविधी, अदानींना विचारा काय घडलं? निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादांचा हा केविलवाणा प्रयत्न!

'महाराष्ट्रात कर्नाटकमधील लाडकी बहीण योजना बंद केल्याची जाहिरात केली, तेलंगणामध्ये बंद केली, अशी दिशाभूल करत आहात. परंतु यांनी पाच महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणींचे पैसे दिले नाहीत. तुम्हाला ते दिसत नाही. फेक नॅरेटिव्ह यांच्या रक्तात आहेत. भाजपने (BJP) खरंच कर्नाटकचे आमंत्रण स्वीकारावे, आणि तोंड स्वच्छ करून परत यावे', असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

'विजय वडेट्टीवार यांनी खोट किती बोलायचे. कापूस, सोयाबीन निघाल्यावर निर्यात करता, भात अन् धान्य निघते तेव्हा तुम्ही एक्सपोर्टमध्ये 25 टक्के लावता. नाक वर करून, महाविकास आघाडीला हिणवता, अरे महायुतीने शेतकऱ्यांचे वाटोळे केले. नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयात कोणी दिले? भाजपने दिले', याची आठवण करून दिली.

'आज पायाखालची वाळू घसरते, म्हणून आज कर्जमाफीची घोषणा करत आहे. कोणाचा सल्ला घेऊन ही घोषणा केली. अमित शाह यांचा सल्ला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतला होता का? नरेंद्र मोदी यांचा सल्ला घेतला होता. पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर जुमलेबाजी सुरू केली आहे. शेतकरी यांना माफ करणार नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे पाप केले आहे. दहा वर्षात 20 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे', असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com