Political Dynasty in India: दर पाचपैकी एक लोकप्रतिनिधी 'घराणेशाही'तून; उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्राचं स्थान कितवं?

ADR Report 21% MPs, MLAs, MLCs in India Have Political Dynasty Background : देशातील राजकारणातील घराणेशाहीवर ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’चा विश्लेषणातून समोर आलं आहे.
Political Dynasty in India
Political Dynasty in IndiaSarkarnama
Published on
Updated on

Association for Democratic Reforms Report: देशाच्या राजकारणातील घराणेशाही नेहमीच चर्चेत असते. सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या घराणेशाहीवर नेहमीच घणाघात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते स्थानिक कार्यकर्ते काँग्रेसच्या घराणेशाहीवर नेहमीच हल्लाबोल चढवतात. आता हीच घराणेशाही भाजपमध्ये देखील दिसू लागली आहे.

काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यातून गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला देखील घराणेशाहीचं ग्रहण लागलेलं दिसत आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) विश्लेषणातून राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवण्यात आलं आहे.

देशातील अंदाजे 21 टक्के म्हणजेच, पाचपैकी एक खासदार, आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य घराणेशाही पार्श्वभूमीचे आहेत, असे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. संपूर्ण देशभरातील आकडेवारी पाहता उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून, 604 खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांपैकी 141 जण (23%) राजकीय कुटुंबातून आले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून, 403 खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्यांपैकी 129 जण (32%) घराणेशाहीच्या पार्श्वभूमीचे आहेत. बिहारमध्ये (Bihar Politics) 360 खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांपैकी 96 जण (27%) राजकीय कुटुंबातील असून, कर्नाटकमध्ये 326 पैकी 94 जणांची (29%) पार्श्वभूमी राजकारणाची आहे.

Political Dynasty in India
India Pakistan cricket match politics : ठाकरेंच्या शिलेदार कडाडल्या, भारतविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना 'बायकाॅट' करा; दहशतवाद पोसणाऱ्या देशाला महसूल मिळणार

देशाच्या राजकारणात नेहमीच, घराणेशाही चर्चेत असते. मुले, नातवंडे, जावई, सुना यांनी देखील राजकारणाला कौटुंबिक व्यवसाय बनवले आहे. तसं ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या विश्लेषणातून समोर आलं आहे. भाजपचे (BJP) राज्य असलेले उत्तर प्रदेश, महाराष्ट्र राज्य राजकारणातील घराणेशाहीत अव्वल असून, काँग्रेसचे राज्य असलेले कर्नाटक देखील देशातील ‘टॉप 4’मध्ये आहे.

Political Dynasty in India
Top 10 News : तळ कोकणातील गावाचा धडाकेबाज निर्णय! ते उत्तम जानकर यांच्या 42 निवडणुकांच्या वक्तव्यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

कर्नाटकात, 29 टक्के प्रतिनिधी राजकाणातील विविध कुटुंबांची पुढील पिढी आहे. या आकडेवारीत आसाम फक्त 9 लोकांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. ‘मोठ्या राज्यांचा टक्केवारीच्या दृष्टीने विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये घराणेशाही प्रतिनिधित्वाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘आंध्र प्रदेशमध्येही घराणेशाही’

आंध्र प्रदेशात 255 खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्यांपैकी 86 (34%) जण राजकीय घराण्यांतून आलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, जिथे 403 पैकी 129 (32%) आणि कर्नाटकात 326 पैकी 94 (29%) सदस्य घराणेशाही पार्श्वभूमीचे आहेत. हे आकडे विशेषतः राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांमधील राजकारणाची स्थिती दर्शवतात,’ असे एडीआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com