Devendra Fadnavis : 'पुन्हा एकदा सांगतो मी मूर्खांना उत्तर देत नाही' ; फडणवीसांचा राऊतांवर पलटवार!

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut : आतारी उबाठा सेनेने हिंदूंचा अपमान करणं बंद करावं, असंही फडणवीस म्हणालेले आहेत.
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Devendra Fadnavis Vs Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Temple Ceremony : अयोध्येतील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापन सोहळा सोमवारी(22 जानेवारी) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात राममय वातावरण झाल्याचं दिसत आहे. तर या सोहळ्यासाठी निमंत्रित व्हीव्हीआयपी व्यक्तींसह रामभक्त लाखोंच्या संख्यने अयोध्येच्या दिशेने जात आहेत. तर भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या सोहळ्यानिमित्त जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक फोटो ट्वीट केला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तर, या फोटोवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना टोलाही लगावला आहे. ज्यावर आता फडणवीसांकडून राऊतांवर पलटवार करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) कारसेवेसाठी अयोध्येला गेले असतानाचा एक फोटो जो तेव्हा वर्तमानपत्रात छापून आला होता, तो फडणवीसांनी ट्वीट केला आहे. हा अयोध्या रेल्वेस्थानकावरील फोटो असून कारसेवकांच्या गर्दीत फडणवीसही दिसत आहेत. तर फडणवीसांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊतांच्या(Sanjay Raut) या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे. त्यांनी त्यावेळचा अंक पाठवला आणि त्यांनी मला सांगितलं, की हा आमच्या संग्रही असलेला फोटो आहे. त्यावेळेस तुम्ही कारसेवेला गेला होता. त्यावेळी आमच्या छायाचित्रकाराने काढला होता. तो फोटो त्यांनी पाठवला म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्वीट केलेला आहे. कारण, त्यावेळची जी परिस्थिती होती. त्या परिस्थितीची आठवण मला झाली. त्या आनंदात मी तो ट्वीट केलेला आहे.'

याचबरोबर 'त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही ट्वीट आहे ते कोणाला उत्तर वैगेरे नाही आणि उत्तर देण्याच्या भागडीतही यासाठी पडायचं नसतं. की हे तेच लोक आहेत, ज्यांनी रामाचं अस्तित्व सुद्धा नाकारलेलं आहे. ज्या लोकांनी राम खरच त्या ठिकाणी जन्माला आले होते का? अशाप्रकारचा प्रश्न विचारला. जे रामालाच मानायला तयार नाहीत, त्यांना मी कशाला उत्तरं देऊ. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मी मूर्खांना उत्तरं देत नाही. मी माझ्या आनंदासाठी हा फोटो ट्वीट केला आहे.' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

याशिवाय 'ज्यांचं या आंदोलनात काहीही योगदान नाही. असे लोक अशाप्रकारचे आरोप करून, स्वत:चं हसं करून घेत आहेत आणि कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आतारी उबाठा सेनेने हिंदूंचा अशाप्रकारे अपमान करणं बंद करावं.' अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? -

'फडणवीसांनी आपला एक जुना फोटो टाकला आहे. तशी छायाचित्र पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही कोर्टासमोर हजर राहिलो ते सगळं आमच्याकडे आहे. तुम्हाला पुरावा द्यायची आम्हाला गरज नाही. तुम्ही कोण? तुमची लोक तिथून पळून गेले हे सगळ्यांना माहीत आहे. शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली. यापेक्षा मोठा पुरावा काय असतो. तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत. आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत. नागपूर स्टेशनला गेला असाल तुम्ही सगळे फिरायला.' असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com