Ayushman Card : तुमच्याकडे आयुष्मान कार्ड आहे? मग एका वर्षात किती वेळा मोफत उपचार घेता येतात? 'या' अटी तुम्हाला माहिती आहेत का?

Ayushman Card rules and conditions 2026 : तुमच्याकडे आयुष्मान कार्ड आहे का? एका वर्षात किती वेळा मोफत उपचार घेता येतात, नियम, अटी आणि मर्यादा जाणून घ्या.
Ayushman Card
Ayushman CardSarkarnama
Published on
Updated on

तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल, तर सरकारी रुग्णालयांसह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेण्याची मोठी संधी तुम्हाला मिळते. मात्र अनेक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डची वार्षिक मर्यादा, उपचार किती वेळा घेता येतात आणि कोणत्या अटी लागू होतात, याची अचूक माहिती नसते. त्यामुळे ही माहिती जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरते.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ सर्वांनाच मिळत नाही. यासाठी केंद्र सरकारने ठरवलेल्या पात्रता निकषांमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या योजनेत समाविष्ट केले जाते. पात्र ठरलेल्या नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार केले जाते आणि त्यानंतर या कार्डच्या माध्यमातून मोफत उपचार घेता येतात.

Ayushman Card
ED action BJP leader : भाजप नेत्याला ईडीचा मोठा दणका! 18 कोटींचे भूखंड सील तर 70 कोटींची संपत्ती जप्त

आयुष्मान कार्ड कसे तयार करावे, याबाबत दोन सोपे मार्ग उपलब्ध आहेत. पहिल्या पद्धतीनुसार, तुम्ही आयुष्मान कार्ड ऑनलाइन पद्धतीने तयार करू शकता. यासाठी pmjay.gov.in या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येते. तसेच आयुष्मान भारत योजनेचे अधिकृत मोबाइल ॲप डाउनलोड करूनही कार्डसाठी अर्ज करता येतो. ऑनलाइन प्रक्रियेत आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासली जाते.

दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाइन अर्ज. यासाठी नागरिकांना त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्रात जावे लागते. येथे आधी अर्जदाराची पात्रता तपासली जाते. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांचे पडताळणी केली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास अर्ज मंजूर केला जातो आणि काही वेळातच आयुष्मान कार्ड तयार होते.

आयुष्मान कार्डची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याची वार्षिक आर्थिक मर्यादा. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. ही मर्यादा एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी असते. म्हणजेच कुटुंबातील कोणताही सदस्य या 5 लाख रुपयांच्या मर्यादेत उपचार घेऊ शकतो.

महत्त्वाचे म्हणजे आयुष्मान कार्डवर उपचार घेण्याच्या वेळांवर कोणतीही ठराविक मर्यादा नाही. म्हणजेच, 5 लाख रुपयांची मर्यादा संपेपर्यंत तुम्ही गरजेनुसार कितीही वेळा उपचार घेऊ शकता. मात्र हे उपचार फक्त आयुष्मान भारत योजनेत नोंदणीकृत रुग्णालयांमध्येच करता येतात. सरकारी रुग्णालयांसोबतच अनेक खासगी रुग्णालयेही या योजनेत सहभागी आहेत.

Ayushman Card
Koregaon ZP Election : कोरेगावचा 'गड' पुन्हा राष्ट्रवादीकडे! आमदार शिंदेंच्या होम ग्राऊंडवर 'घड्याळा'चा गजर

आयुष्मान कार्डची 5 लाख रुपयांची मर्यादा प्रत्येक आर्थिक वर्षात नव्याने उपलब्ध होते. म्हणजेच दरवर्षी ही रक्कम रिन्यू होते. मात्र एखाद्या वर्षात ही संपूर्ण रक्कम संपल्यास, पुढील आर्थिक वर्ष सुरू होईपर्यंत नवीन मर्यादेची वाट पाहावी लागते. त्यामुळे गरज नसताना अनावश्यक उपचार टाळणे आणि योग्य वेळी योग्य उपचार घेणे लाभार्थ्यांसाठी फायदेशीर ठरते.

थोडक्यात, आयुष्मान कार्ड हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आरोग्याच्या दृष्टीने मोठा आधार आहे. मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी या योजनेच्या अटी, मर्यादा आणि प्रक्रिया यांची सविस्तर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com