Baba Siddique Dead Updates : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, पंजाब कनेक्शन उघड

Baba Siddique Dead suspects Praveen Lonkar Zeeshan Akhyat arrested Police : प्रवीण लोणकर नावाच्या तरुणाला पुण्यावरून अटक करण्यात आली आहे. तर,दुसरा आरोपी आरोपी झिशान अख्तर याला पंजाबमधील जालंधर येथून अटक करण्यात आली आहे.
baba Siddique  (1).jpg
baba Siddique (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique Dead Updates : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना आणखी दोघा आरोपींना अटक केली आहे. प्रवीण लोणकर नावाच्या संशयिताला पुण्यावरून अटक करण्यात आली आहे. तर, झिशान अख्तर या संशयीताला पंजाबमधील जालंधर येथून अटक करण्यात आली आहे.

झिशान हा जालंधरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना आधीच अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.

28 वर्षीय प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर यांचा भाऊ आहे. प्रवीण लोणकर हा गटातील एक सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे.शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट टाकत बाबा सिद्दिकी यांच्या हस्तेची जबाबदारी स्वीकारली होती.

दरम्यान 2022 मध्ये अटक झाल्यानंतर झीशान अख्तर तुरुंगात गेला तेव्हा त्याची पटियाला तुरुंगात बिष्णोई गँगशी संबध आला होता. यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मुंबईला गेला. झीशान अख्तर हा जालंधरच्या नकोदर भागातील आकार गावचा रहिवासी आहे.

baba Siddique  (1).jpg
Top Ten News: बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी?, मोहोळांनी घेतली वाहतूक पोलिसाची गळाभेट, नायबसिंह सैनी यांना जीवे मारण्याची धमकी - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

दोन ते तीन लाखांची सुपारी

सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळूनच अटक करण्यात आली होती. तसेच या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे या आरोपींना बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी अडीच ते तीन लाखांचे कंत्राट मिळाले होते. हत्येनंतर आरोपी हे पैसे आपआपसात वाटून घेणार होते.

baba Siddique  (1).jpg
MVA News : आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटेना; राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवल्याची चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com