राज्यपालांनी असे उत्तर दिले की महाविकास आघाडीचे नेते चाट पडले...

Assembly president election : पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध-सरकार अशी ठिणगी
Bhagatsingh Koshyari - Eknath Shinde - Balasaheb Thorat - Chhagan Bhujbal Assembly president election

Bhagatsingh Koshyari - Eknath Shinde - Balasaheb Thorat - Chhagan Bhujbal

Assembly president election

Published on
Updated on

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारकडून आलेल्या १२ आमदारांच्या नावाला अद्याप मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार (Governor vs Government) असा संघर्ष मागच्या काही दिवसांपासून सुरुच आहे. पण आता राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रम प्रस्तावाला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध-सरकार अशी ठिणगी पडली आहे.

याच मुद्दांवर राज्यपालांची (Bhagatsingh Koshyari) मनधरणी करुन त्यांनी परवानगी द्यावी यासाठी महाविकास आघाडीचे तीन बड्या नेत्यांचे शिष्टमंडळ राजभवनावर गेले होते. या शिष्टमंडळात मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), काँग्रेस विधिमंडळ गटनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश होता. मात्र यावेळी राज्यपालांनी दिलेल्या उत्तराने महाविकास आघाडीतील नेते अक्षरशः चाट पडले आणि मोकळ्या हाताने राजभवनाबाहेर आले.

Bhagatsingh Koshyari - Eknath Shinde - Balasaheb Thorat - Chhagan Bhujbal

Assembly president election

Obc Reservation : भाजपचं राज्य अडचणीत येताच केंद्राला जाग; उचलंल मोठं पाऊल...

या भेटीनंतर बोलताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर राज्यपालांना दिलेला आहे. या कार्यक्रमाला मंजूरी द्यावी अशी विनंती मी, मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मतदानाच्या स्वरुपात झालेल्या बदलाबाबतही त्यांनी काही विचारले नाही, पण आपण चुकीचे किंवा वेगळे काही केलेले नाही. जी प्रक्रिया लोकसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये आहे, तीच प्रक्रिया विधानसभेत आणली आहे. मात्र राज्यपालांना काही माहिती घ्यायची आहे, काही अभ्यास करायचा आहे. त्याबाबत त्यांना काही लोकांचा सल्लाही घ्यायचा आहे, तो घेवून ते कळवतो म्हणाले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

सध्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, त्यामुळे ते उद्या सकाळपर्यंत ते मान्यता देतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मतदान प्रक्रियेतील बदलामुळे कोणतीही अडचण येणार नाही. राज्यघटना आहे, प्रक्रिया आहे. नियमांमध्ये बदल करण्याचा विधानसभेचा अधिकार आहे. फक्त त्यांना काही अभ्यास करायचा आहे, तो करतो आणि कळवतो असे सांगितले आहे. शेवटी बिगर अध्यक्षांची विधानसभा कशी ठेवू शकतो अशीही विचारणा थोरात यांनी केली. तसेच भगतसिंग कोश्यारी खूप अनुभवी आणि खूप सिनीयर आहेत ते असेही ते म्हणाले.

Bhagatsingh Koshyari - Eknath Shinde - Balasaheb Thorat - Chhagan Bhujbal

Assembly president election

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार; 'मविआ'चे बडे नेते मनधरणीसाठी राजभवनावर

महाराष्ट्र विधानसभेत सध्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Assembly President Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी अर्ज भरायचे आहेत. मात्र सध्या राज्यपालांनी अजूनही या निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल दिलेला नसल्याने हा निवडणूक कार्यक्रम केवळ कागदोपत्री राहणार का? असा सवाल विचारला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने २३ डिसेंबर रोजी राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळविले आहे, पण त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतरच सभागृहाच्या दैनंदिन कामकाजात या निवडणूक कार्यक्रमाचा समावेश होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com