Election News : मोठी बातमी ! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; 'हे' आहे कारण

Political News : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची सुरु असलेली तयारी आता थांबणार आहे. 1 जानेवारी 2025 नंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत.
 Election
Election Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. या राज्यातील सुमारे राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरनंतर होणार आहेत.

त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची (Election Commision) सुरु असलेली तयारी आता थांबणार आहे. 1 जानेवारी 2025 नंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. (Election News)

राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे वाटत असतानाच पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका आता 1 जानेवारी 2025 नंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी या निवडणुकांचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ज्या सहकारी येत्या काळात निवडणूक होणाऱ्या संस्थांमध्ये राज्यातील 'अ' वर्गातील 42, 'ब' वर्गातील 1716, 'क' वर्गातील 12 हजार 250 आणि 'ड' वर्गातील 15 हजार 435 अशा मिळून एकूण 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये शहरातील 828, तर ग्रामीण भागातील 2220 अशा एकूण 3048 संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

राज्यात पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansbha Election) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होणार का, याबाबत अद्यापही संभ्रम असतानाच विधानसभा निवडणुकांची घोषणा लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com