कोण हा किरण माने? : 'त्या' वादावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

Kiran Mane Controversy : प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज माध्यमांना याबाबतची भाजपकडून प्रतिक्रिया दिली
Kiran Mane - Pravin Darekar
Kiran Mane - Pravin Darekar Sarkarnama

मुंबई : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आले. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार मांडल्यामुळेच आपल्याला या मालिकेतून काढण्यात आल्याचे किरण मानेंनी सांगितले आहे. यानंतर मागच्या तीन ते चार दिवसांपासून आता राजकीय वर्तुळातूनही स्टार प्रवाह आणि भाजपवर तीव्र शब्दात टीका केली जात आहे. याच सगळ्या टीकेवर भाजपकडून (BJP) पहिल्यांदाच "कोण हा किरण माने?" असा सवाल विचारत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज माध्यमांना याबाबतची भाजपकडून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात अनेक सिनेकलाकार बोलत असतात. जावेद अख्तर, शाहरुख खान हे देखील बोलत असतात. पण त्यांना कोणी कामावरून काढले का? जर देशपातळीवर काही होत नसेल तर मग कोण हा किरण माने? का एवढा इश्यू त्यांचा? भाजपचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध? यावर सगळे राजकारण करत महाविकास आघाडीकडून इमोशनल स्ट्रॅटेजी पुढे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कोणी माने न माने आमच्यासाठी संधी किरण माने असा टोलाही दरेकर यांनी महाविकास आघाडीला लगावला.

Kiran Mane - Pravin Darekar
सिंधुदुर्ग जिल्हा बँक 'राणेमय' : बाळासाहेबांसह शरद पवार, सोनिया गांधींचे फोटो गायब

केंद्राने साह्य करूनही ठाकरे सरकारच्या तक्रारी

कोरोना सुरुवात झाल्यापासून केंद्राने महाराष्ट्राला सर्व गोष्टी दिल्या, पण पहिल्या दिवसापासून आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राला दोष द्यायाचा हे सुत्र महाविकास आघाडी सरकारने चालवले आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून १० दिवस पुरेल एवढा लससाठा उपलब्ध असल्याचे सांगून महाविकास आघाडीला उघड पाडलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारचा करणी आणि कथणी यातील फरक उघडा पाडला आहे.

Kiran Mane - Pravin Darekar
अखेर ठरलं! अयोध्या अन् मथुरेकडे पाठ फिरवून योगी सुरक्षित मतदारसंघात!

राष्ट्रवादी शिवसेनेला डॉमिनेट करण्याचे काम करतीय

आज कळवा येथील पूलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे एकत्रित उपस्थित होते. त्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांची घोषणाबाजी सुरू झाली. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून येथे महाविकास आघाडी आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या घोषणा द्या, अशी विनंती करावी लागली. याच गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना प्रत्येक ठिकाणी डॉमिनेट करत असल्याचा आरोपही प्रविण दरेकर यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com